Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याशेतकऱ्यांची चिंता वाढणार; मान्सून संदर्भात मोठी अपडेट

शेतकऱ्यांची चिंता वाढणार; मान्सून संदर्भात मोठी अपडेट

मुंबई | Mumbai

राज्यात सातत्याने कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rains) शेतकरी (Farmer) हैराण झाला आहे. अगोदर एप्रिल आणि आता मे महिन्याच्या सुरुवातीला सुद्धा राज्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस सुरू असून कडाक्याच्या उन्हाने त्रस्त असणाऱ्या नागरिकांना यंदा मे महिन्यात गारेगार वातावरण अनुभवण्यास मिळत आहे. त्यामुळे आता अवकाळी पावसाची परिस्थिती कायम राहिल्यास त्याचा परिणाम मान्सूनवर (Monsoon) होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- Advertisement -

देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला; कुटुंबातील चार जणांसह एकाचा मृत्यू

याबाबत हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तविलेल्या अंदाजानुसार, उन्हाळ्यात कडक ऊन पडले नाही तर त्याचा विपरीत परिणाम मान्सूनच्या वाटचालीवर होऊ शकतो. तसेच मान्सूनला विलंब झाल्यास त्याचा परिणाम पेरणी (Sowing) आणि पिकांवर होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. तर खरीप हंगामात (Kharif Season) पावसामध्ये खंड पडल्यास शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे.

प्रेस कामगार नेत्याच्या मुलाचे रशियात अपघाती निधन

तर दुसरीकडे ग्लोबल वार्मिंगमुळे निसर्गाचे चक्र असंतुलित होत आहे. तसेच यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यातच आता एप्रिल आणि मे महिन्यात अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने या पावसाचा गंभीर परिणाम हा मान्सूनवर होऊ शकतो अशी शक्यता हवामान तज्ज्ञांकडून (Meteorologist) वर्तविण्यात येत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या