Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्यामनसेना अध्यक्ष राज ठाकरे आजपासून नाशिक दौर्‍यावर

मनसेना अध्यक्ष राज ठाकरे आजपासून नाशिक दौर्‍यावर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सुमारे पाच महिन्यानंतर महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौर्‍यावर येत आहे. उद्या सकाळी त्यांचे नाशिकमध्ये आगमन होणार आहे. इगतपुरीत त्यांचे मनसैनिकांच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. ते तीन दिवस नाशिकमध्ये राहणार असून या काळात पक्ष संघटनात्मक बांधणीसह विविध बैठका तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांशी ते शासकीय विश्रामगृहावर चर्चा करणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ते पराग शिंत्रे यांनी दिली.

- Advertisement -

एकेकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या नाशिक शहर तसेच जिल्ह्याकडे राज ठाकरे यांचे मागील काही काळापासून दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पक्षातील पदाधिकार्‍यांमध्ये मरगळ आल्याचे दिसून येत आहे. तर पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून तसेच काही लोकांकडून नाहक बदनामी करण्यात येत असल्यामुळे पक्षाचे शहराध्यक्ष असलेले दिलीप दातीर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर पक्षाला ऊर्जा देण्यासाठी तसेच आगामी महापालिका व इतर निवडणुकांच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी राज ठाकरे हे मैदानात आले आहे. ठाकरे नाशिक दौर्‍यावर येत असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दौर्‍यात राज ठाकरे पक्षाच्या विविध पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधणारा आहे तसेच महापालिका निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना देखील करणार आहेत.

2012 च्या महापालिका निवडणुकीत नाशिककरांनी राज ठाकरे यांच्या ब्ल्यू प्रिंट वर विश्वास ठेवत तब्बल 40 नगरसेवक निवडून दिले होते. त्यामुळे 20212 ते 2017 याकाळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महापौर होता. त्या काळात राज यांनी नाशिकच्या विकासासाठी विशेष लक्ष दिले होते. सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन चोखपणे झाले होते, तर राज यांच्या पुढाकाराने बोटॅनिकल गार्डन, बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालय, ट्राफिक चिल्ड्रन पार्क, गोदा पार्क, रिंग रोड आदी महत्त्वाची प्रकल्प मार्गी लागली होती.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

शहराचे सुशोभीकरणावर त्यांनी विशेष लक्ष देऊन उड्डाणपुलाच्या खाली देखील सुशोभीकरण करून घेतले. त्या काळात राज्य शासनाकडून महापालिकेला अनेक वेळा पूर्ण वेळ आयुक्त देखील मिळाले नव्हते तरीही आम्ही भरपूर विकास कामे केल्याचा दावा करण्यात येतो.

विकास कामांच्या जोरावर 2017 ची महापालिका निवडणूक आपण पुन्हा जिंकू असे वाटत असताना पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर येऊन पक्षातील अनेक मोठे नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकून बाहेर पडले. त्याचा फटका बसून अवघे पाच नगरसेवक निवडून आले होते, मात्र आता आगामी महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्धार महाराष्ट्र निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला असून त्यासाठी पक्षाचे युवा नेते अमित ठाकरे सतत नाशिक दौरे करीत आहे. आता राज ठाकरे देखील मैदानात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या