Friday, May 3, 2024
Homeनगरचांदा, बऱ्हाणपूरला चक्रीवादळाचा तडाखा

चांदा, बऱ्हाणपूरला चक्रीवादळाचा तडाखा

चांदा |वार्ताहर| Chanda

नेवासा (Newasa) तालुक्यातील चांदा (Chanda), बऱ्हाणपूर (Barhanpur) परीसराला काल रात्री चक्रीवादळाचा (Cyclonic Storm) भयकंर तडाखा बसला. त्यामध्ये बऱ्हाणपूर येथे प्रचंड नुकसान झाले असून जवळपास २० घरांचे मोठे नुकसान (Home Loss) झाले असून अनेक घरांचे पत्रे उडाले असून शेकडो झाडे पडली आहेत. प्रशासनाने सकाळपासूनच पंचनामे सुरू केले आहेत.

- Advertisement -

नेवासा (Newasa) तालुक्यातील बऱ्हाणपुर (Barhanpur) परिसरात काल सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास भयंकर चक्रीवादळाचा (Cyclonic Storm) तडका बसला. यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान (Loss) झाले असून वस्तीवर राहणाऱ्या तसेच बऱ्हाणपुर गावातील जवळपास 20 लोकांचे घराचे मोठे नुकसान झाले आहे. तर अनेकांच्या घराचे छत वाऱ्याने उडून गेल्याने प्रपंच उघड्यावर आले आहेत. बऱ्हाणपुर (Barhanpur) परिसरातील वाडी वस्तीवर शेकडो झाडे उन्हाळून पडली.

वाऱ्याचा वेग एवढा प्रचंड होता की, कांदाचाळीत घातलेला कांदाही या पावसाने भिजला आहे. बाहेर पडलेल्या कांद्यावरील (Onion) कागद उडून गेल्याने मोठमोठाल्या पोळी पाण्याखाली होत्या. काही घरांच्या  भिंतीही पडल्याने त्यांना पावसात भिजत रात्र काढावी लागली. बऱ्हाणपूर सोसायटीचे ऑफिस आणि शेडचे पत्रे चक्रीवादळामुळे उडून दूर जाऊन पडले आहेत. तर गणेश मच्छिंद्र चव्हाण, बाळासाहेब शिंदे, माणिक शिंदे, प्रमोद दरंदले, बाबासाहेब ससे, जालिंदर खोमणे, शिवाजी शेळके, पोलीस पाटील पाराजी शेळके, संजय शिरसाट, सुधाकर सोनवणे, प्रवीण चव्हाण आदींच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे.

दत्तवाडी शाळेजवळील मोठे झाड रस्त्यावर पडल्याने वाहतुक बंद झाली होती . मायनर क्रमांक सहा येथे चव्हाण वस्तीवर झाड पडल्याने तेथेही वाहतुक बंद झाली होती .सदर चक्रीवादळाची माहिती समजतात बऱ्हाणपूरचे कामगार तलाठी ए .के. आघाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक उदय मिसाळ गावच्या सरपंच कुंदा चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत झालेल्या घटनेचे पंचनामे सुरू केले आहेत.

दरम्यान चक्रीवादळाने (Cyclonic Storm) वीज वितरण कंपनीचे मोठे (MSEDCL) नुकसान झाले असून अनेक ठिकाणी मेन लाईन तसेच एल टी लाईनचे पोल पडले आहेत. वीज वितरण अधिकारी श्री बडे व श्री खताळ लाईनमन श्री गाढवे श्री बर्वे व सर्व टीम सकाळपासूनच झालेल्या नुकसानीची माहिती घेत वीस पुरवठा तातडीने सुरू करण्यासाठी दिवसभर प्रयत्नशील होते. सायंकाळच्या वेळेस वीज पुरवठा सुरळीत करण्यास बऱ्याच भागात यश आले असल्याची माहिती वीज वितरण कंपनीकडून (MSEDCL) देण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या