Saturday, May 4, 2024
Homeनगरकुकडी पाटबंधारे विभागाचा कारकून लाचेच्या जाळ्यात

कुकडी पाटबंधारे विभागाचा कारकून लाचेच्या जाळ्यात

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

कुकडी पाटबंधारे विभागाच्या (Kukadi Irrigation Department) धनगरवाडी (ता. श्रीगोंदा) जलाशयातून पाणी उपसा परवानगी प्राप्त करून दिल्याच्या मोबदल्यात शेतकर्‍याकडून (Farmer) दीड हजाराची लाच (Bribe) स्वीकारताना कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग (Kukadi Irrigation Department) क्रमांक दोन कार्यालयातील दप्तर कारकून याला रंगेहाथ पकडले. सुभाष यादवराव वाबळे (वय 56 रा. जकाते वस्ती, स्टेशन रस्ता, श्रीगोंदा) असे त्याचे नाव आहे.

- Advertisement -

नगर-पुणे महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

हंगेवाडी (ता. श्रीगोंदा) येथील शेतकर्‍याची बोरी (ता. श्रीगोंदा) येथे शेत जमीन आहे. त्यातील एक हेक्टर क्षेत्रासाठी धनगरवाडी जलाशयातून पाणी उपसा करण्याची परवानगी मिळण्याबाबतचा अर्ज त्यांनी कार्यकारी अभियंता कुकडी पाटबंधारे विभाग (Kukadi Irrigation Department) क्रमांक दोन, श्रीगोंदा यांच्याकडे केला होता. सदर परवानगी प्राप्त करून दिल्याच्या मोबदल्यात दप्तर कारकून वाबळे याने शेतकर्‍याकडे दोन हजार रूपये लाचेची मागणी केली होती.

‘अशोक’चा माजी अध्यक्ष सोपान राऊतला अटक

याबाबत संबंधीत शेतकर्‍याने येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti-Bribery Department) तक्रार दाखल केली होती. त्यानुसार लाचलुचपत विभागाने शनिवारी (दि. 12) पडताळणी केली असता वाबळे याने पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती दीड हजार रूपयांची लाच (Bribe) मागणी करून रक्कम स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. वाबळे विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात (Shrigonda Police Station) गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे, उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आर.बी.आल्हाट, अंमलदार रमेश चौधरी, विजय गंगुल, राधा खेमनर, रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, वैभव पांढरे, दशरथ लाड यांच्या पथकाने केली आहे.

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली साडे तेरा कोटींची फसवणूकइंदुरीकर महाराजांविरोधातील पुरावे न्यायालयासमोर सादर करणार

- Advertisment -

ताज्या बातम्या