Saturday, May 4, 2024
Homeनगरकोठला भागात दोन गटात हाणामारी

कोठला भागात दोन गटात हाणामारी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कोठला भागात रविवारी (दि. 1) सकाळी दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन गटांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

शहनाज अख्तर अन्सारी (वय 22 रा. सलीम भंगारवाला मागे, कोठला) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सना इरफान शेख, सोनी जावेद शेख (दोघी रा. सलीम भंगारवाला मागे, कोठला) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्सारी यांच्या फिर्यादीत म्हटले आहे की, सना व सोनी यांनी दोघींनी रविवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास माझ्या मुलाला लाथाबुक्क्यांनी व मला प्लास्टिकच्या पाईपने मारहाण केली. मुलगा आमच्या घराकडे आला तर त्याला व तुला मारून टाकू, अशी धमकी दिली.

दुसर्‍या गटाचे जमील सलीम शेख (वय 34 रा. मस्तान शहा चौक, कोठला) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जावेद गब्बार शेख, दोन मुले (नावे माहिती नाही), सादीक जावेद शेख, सज्जू जावेद शेख, सना इरफान शेख (सर्व रा. मस्तान शहा चौक, कोठला) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख यांच्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी रविवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास महेश टॉकीज जवळून छत्रपती संभाजीनगर रस्त्याकडे जात असताना जावेद शेख व इतर त्यांच्या दुचाकीवरून आले व तुझी बायको आमच्या घरी येऊन भांडणे करते, असे म्हणून शिवीगाळ करत मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या