Saturday, May 4, 2024
Homeनाशिकमोबाईल नंबर सुरू ठेवण्यासाठी करावा लागणार ‘हा’ रिचार्ज

मोबाईल नंबर सुरू ठेवण्यासाठी करावा लागणार ‘हा’ रिचार्ज

नाशिक । तुमच्या मोबाईल नंबरला सुरु ठेवण्यासाठी प्रत्येक महिन्याला रिचार्ज करावा लागणार आहे. याआधी रिचार्ज संपल्यावर इनकमिंग कॉलसाठी कोणतीही मर्यादा नव्हती. आता मात्र रिचार्ज न केल्यास सात दिवसांनी ही सुविधा देखील बंद केली जाणार आहे. त्यामुळे एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाच्या ग्राहकांना अनुक्रमे 23 व 24 रुपयांचे रिचार्ज करून आपला मोबाईल नंबर सुरु ठेवावा लागणार आहे.

खासगी टेलिकॉम कंपन्यांनी या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून रिचार्जचे दर वाढवले आहेत. एअरटेल, व्होडाफोन-आयडियाने आपल्याग्राहकांसाठी इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी लागणाऱे शुल्क आकारले जाणार नसल्याचं जाहीर केले. तर जिओने मात्र इतर नेटवर्कसाठी 6 पैसे प्रतिमिनिट दर आकारला आहे.

- Advertisement -

एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाच्या ग्राहकांसाठी ऊटगोईंगसाठी शुल्क न आकारण्याची एक चांगली बातमी असली तरी दुसरी बातमी मात्र खिशाला कात्री लावणारी आहे. या टेलिकॉम कंपन्यांनीप्रीपेड प्लॅन महागडे केले असतानाही मिनिमम रिचार्ज पॉलिसी मात्र बंद केलेली नाही.

मोबाइल नंबर सुरू ठेवण्यासाठी एअरटेलने 23 तर व्होडाफोन-आयडियाने 24 रुपये कमीत कमी रिचार्ज करावा लागेल असे सांगत 20, 30 रुपयांचे टॉक टाइम प्लॅन रिलाँच केले आहेत.रिचार्जची मुदत संपल्यानंतर तुमचे आऊट गोइंग कॉल्स त्याच वेळी बंद होतात. तर 7 दिवसांच्या आत रिचार्ज केला नाही तर इनकमिंग कॉल्स बंद होतील.

याआधी इनकमिंग कॉल्स येण्यासाठी रिचार्ज असणेआवश्यक नव्हते. आता एअरटेलचा मिनिमम प्लॅन 23 रुपयांचा तर आयडियाचा 24 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना कोणताही डेटा, टॉक टाइम किंवा एसएमएस मिळत नाही. हे प्लॅन फक्त प्रीपेड अकाउंटची मुदत वाढवण्यासाठी आहेत. एअरटेलच्या प्लॅनची वैधता 28 दिवसांसाठी तर व्होडाफोन-आयडियाने 14 दिवसांसाठी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या