Friday, May 3, 2024
Homeनाशिकत्र्यंबकेश्वर : येत्या २२ डिसेंबरला हरसूल येथे जलथॉन स्पर्धेचे आयोजन

त्र्यंबकेश्वर : येत्या २२ डिसेंबरला हरसूल येथे जलथॉन स्पर्धेचे आयोजन

लक्ष्मण पवार । हतगड

हतगड-त्र्यंबकेश्वर हरसूल येथे २२ डिसेंबर २०१९ रोजी एकदिवसीय जल परिषद निमित्ताने जलथॉन स्पर्धा आयोजित केली असून सदरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी फार्म भरून १५ डिसेंबर पर्यंत जमा करणे आहे. सदरील स्पर्धा ही पाणी टंचाई विषयी जनजागृती करणे व लोकसहभाग वाढवा ह्या उदांत हेतूने जलथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

- Advertisement -

त्या करिता इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा तालुक्यातील जास्तीत जास्त शाळेतील स्पर्धकांचा सहभाग असावा व गेल्या वर्षा पासून जी पाणी टंचाई या गावांमध्ये आहे. तसे भरमसाठ पाणी पडून ही ज्या प्रकारे उन्हाळ्यात महिला ना डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावे लागते.त्यासाठी पूर्ण पाणी टंचाई कुठे प्रभावी उपाययोजना व्हावी या साठी जलपरिषद आयोजित करीत आहेत.

जलपरिषदेचा उद्देश फक्त पाणी टंचाई उपाय योजना याचा आपण यासाठी सगळ्यांंना आणीत आहे. यामध्ये खासदार आमदार, शासकीय अधिकारी, बंधू भगिनी यांना जलपरिषद साठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान जलपरिषदचे राकेश दळवी, देविदास कामडी व आदींनी केले आहे .

- Advertisment -

ताज्या बातम्या