Saturday, May 4, 2024
Homeजळगावएलएचबी कोच प्रकल्प गुंडाळला

एलएचबी कोच प्रकल्प गुंडाळला

भुसावळात 120 कोटी रुपयांचा मेमू कारशेड कारखाना

भुसावळ  – 

भुसावळात 120 कोटी रुपयांचा मेमू कारशेड दुरुस्ती कारखाना सुरु करण्यात येणार आहे. तसेच महिन्याभरात भुसावळ विभागात मेमू पॅसेंजर गाड्या धावणार आहे. मात्र, भुसावळ येथे होणारा महत्वाकांक्षी एलएचबी कोच फॅक्टरीचा प्रकल्प गुंडाळला गेला आहे.

- Advertisement -

भुसावळ विभागात 130 किमी प्रती ताशी वेगाने एक्स्प्रेस गाड्या धावणार आहे. यासाठी रेल्वेकडून मंजुरी आल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजिव मित्तल यांनी दिली. ते शुक्रवारी भुसावळात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

रेल्वे प्रशासनाने महत्वाकांक्षी एलएचबी कोच फॅक्टरीसाठी रेल्वे हद्दीतील झोपडपट्टी धारकांचे अतिक्रमण काढले होते. मात्र या ठिकाणी एलएचबी कोच फॅक्टरी ऐवजी 120 कोटी रुपयांच्या खर्चात मोमू कारशेड दुरुस्ती कारखान्याला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पाचे काम तसेच वर्कशॉप प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन पटना या कंपनीला देण्यात आले आहे. साधारण दीड वर्षात या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. मित्तल यांनी दिली. मेमू लोको पायलट कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले असून महिनाभरात साधारण 26 जानेवारीपर्यंत विभागात मेमू पॅसेंजर गाडया धावणार आहे. भुसावळ येथील

स्थानकावरील जुन्या पदाचारीपुलाच्या नुतनीकरणाचे बंद असलेले काम आगामी मार्च एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.तसेच प्रवासी सुरक्षेवर अतिरिक्त लक्ष दिले जात आहे. श्री. मित्तल यांनी भुसावळ विभागाच्या दौर्‍यात सकाळी खंडवा स्थानकासह विविध विभागात निरीक्षण केले. यानंतर बर्‍हाणपुर , रावेर, भुसावळ स्थानकावर पहाणी करुन विविध विभागांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच खासदार, आमदार, रेल्वे सल्लागार समिती सदस्य, युनियनच्या पदाधिकार्‍यांसोबत बैठका घेवून विविध विषायांवर चर्चा केली.  पत्रकार परिषदेला डिआरएम विवेककुमार गुप्ता, एडीआरएम मनोज सिंह, सिनीयर डिसीएम आर. के. शर्मा,  मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार, मंडळ अभियंता राजेश चिखले, मंडळ सुरक्षा आयुक्त ए.पी. दुबे,  मुख्य वाणिज्य व्यवस्थापक के. दादाभाय उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या