Saturday, May 4, 2024
Homeनाशिक१९ जानेवारीला शिक्षक पात्रता चाचणी परीक्षा

१९ जानेवारीला शिक्षक पात्रता चाचणी परीक्षा

नाशिक । प्रतिनिधी

शिक्षक पात्रता चाचणी(टीईटी)परीक्षेसाठी जिल्ह्यातील ६१ केंद्रांवर रविवारी (दि.१९) परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी २२ हजार ८०८ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. पहिल्या पेपरसाठी १२ हजार ६७९ परीक्षार्थी तर, पेपर दोनसाठी दहा हजार १२९ परीक्षार्थी प्रविष्ट होणार आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे ही परीक्षा घेण्यात येणार आहे. प्राथमिक शिक्षण स्तर (पेपर एक) व उच्च प्राथमिक शिक्षण स्तर (पेपर दोन) यासाठी जिल्हाभरातील ६१ परीक्षा केंद्रांवर २२ हजार ८०८ परीक्षार्थी प्रविष्ट होतील. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे परीक्षेचे नियोजन करण्यात येणार आहे.

सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत प्राथमिक शिक्षण स्तर (पेपर क्रमांक एक) परीक्षा घेण्यात येणार आहे. पेपर एकसाठी १२६७९ परीक्षार्थिंनी अर्ज केले आहेत, तर उच्च प्राथमिक शिक्षण स्तर (पेपर क्रमांक दोन) दुपारी २ ते ४.३० यावेळेत घेण्यात येणार आहे. त्यासाठी दहा हजार १७९. परीक्षार्थिंचे अर्ज दाखल झाले आहेत. पेपर एक व पेपर दोन या दोन्ही विषयांतील बालमानसशास्त्र, गणित व इंग्रजी या विषयांतील प्रश्न राहणार आहेत.

शिक्षक पात्रता परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधितांना सूचना करण्यात आल्या आहेत. दोन टप्प्यात ही परीक्षा होत असून त्यादृष्टीने नियोजन झाले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी(प्राथमिक) डॉ.वैशाली झनकर यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या