Tuesday, May 7, 2024
Homeनाशिकनाशिकच्या विकासाला मुख्यमंत्री गती देतील काय?

नाशिकच्या विकासाला मुख्यमंत्री गती देतील काय?

सातपूर । प्रतिनिधी

सुवर्ण त्रिकोणातील एक कोन व सक्षमतेचे पुरावे दिल्यानंतरही नाशिकच्या औद्योगिक विकासाला लागलेले ग्रहण कधी व कसे सूटणार याकडे उद्योजक डोळे लाऊन बसले आहेत. मागील पंचवर्षिमध्ये सावत्र पालकांच्या भूमिकेनंतर सत्तांतरातून काही बदलांची अपेक्षा उद्योजकांनी व्यक्त केल्या आहेत.

- Advertisement -

विमान सेवेला द्यावी गती
नाशिक जिल्ह्यातून कृषी उत्पादनांची निर्यात मोठ्या प्रमाणात होते. सर्व सुविधांनी सज्ज विमानतळवरुन शासनाच्या ‘उडान’ योजनेत सहभागी होण्याचे अभिवचन देणार्‍या विमान कंपन्यांचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे. एचएएलच्या पुढाकाराने शासनाने ओझर विमानतळाला ‘मेन्टेनन्स, रिपेअरिंग व ऑपरेटींग’(एमआरओ) प्रणाली मंजूर केली आहे. या प्रणालीला गती देऊन विमानांची देखभाल व दुरूस्ती करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत. यासोबतच नवीन औद्योगिक धोरण तयार होणे गरजेचे आहे.
– मनीष कोठारी, माजी अध्यक्ष इन्स्टियूशन ऑफ इंजिनिअर्स

‘वन नेशन वन टॅक्स’करा
देशांतर्गत व राज्यांतर्गत ‘वन नेशन वन टॅक्स’ पद्धत लागू करावी. राज्यात विजेच्या दरामुळे राज्यांतर्गत स्पर्धा तयार होत आहे. ती थांबवण्यासाठी ‘वन नेशन वन टॅक्स’ पद्धत लागू करावी. उद्योग क्षेत्राच्या भुमिगत गटारीचा प्रश्न मार्गी लावावा. मनपा व एमआयडीसी ऐवजी मुख्यमंत्र्यांनी विशेष निधीतून हा प्रश्न सोडवावा. औद्योगिक प्रदर्शन केंंद्राच्या उभारणीतील अडसर तातडीने दूर व्हावे. प्लेटींग उद्योगांंचा इटीपी प्रकल्पासाठी एमआयडीसीच्या निर्धारित निधीची पूर्तता व्हावी.
-मंगेश पाटणकर, माजी अध्यक्ष निमा

आयटी पार्क तयार व्हावे
पुणे, मुंबईच्या तुलनेत नाशिकला सुमारे 250 आयटी उद्योग खासगी जागेत सुरू आहे. अंबड औद्योगिक वसाहतीत आयटी उद्योगांसाठी उभारण्यात आलेली इमारत अनेक वर्षांपासून पडीक होती. आता ती आयटी उद्योगांसाठी द्यावी. या सोबतच आयटीसाठी राखीव 42 एकर भूखंडापैकी 14 एकर भुखंड शिल्लक आहे. या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन आयटी पार्क उभारण्यात यावे.
-अरविंद महापात्रा, अध्यक्ष निटा

दिंडोरीत फूडक्लस्टर उभारावे
दिंडोरी औद्योगिक वसाहतीतील जमिनीचे दर सिन्नरच्या प्रमाणात करावे. नाशिकच्या सिमेलगत १२५ किलो मीटरवर गुजरातचे वापी, सिल्व्हासा, वलसाड उद्योग क्षेत्र आहे. त्यामुळे उद्योग बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावीे. दिंडोरीत शासकिय खर्चाने फूड प्रोसेसिंग क्लस्टर उभारण्यात यावे. एचएएलच्या माध्यमातून दिल्लीसह विविध शहरांना जोडणार्‍या विमान सेवेसोबतच कार्गो सेवा सुरू करावीे. नाशिक विमानतळ दिंडोरीपासून जवळ असल्याने या परिसराला ‘एक्स्पोर्ट हब’ निर्माण करावे.
-संजय सोनवणे, उपाध्यक्ष निमा

- Advertisment -

ताज्या बातम्या