Saturday, May 4, 2024
Homeनाशिकनाशिक : ‘भावली’ भागवणार ९७ आदिवासी गावे आणि २५९ पाड्यांची तहान

नाशिक : ‘भावली’ भागवणार ९७ आदिवासी गावे आणि २५९ पाड्यांची तहान

मुंबई | प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील 97 आदिवासी गावे व 259 पाड्यांना नाशिक जिल्ह्यातील भावली धरणातून पाणीपुरवठा केला जाणार आहे.

- Advertisement -

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत ग्रीड पद्धतीने पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली आहे.

पाणीपुरवठा योजनेच्या दरडोई खर्चाच्या निकषांच्या 100 टक्‍क्‍यांहून अधिक दरडोई खर्च असणाऱ्या योजनांच्या प्रस्तावांना मान्यता देण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली आहे.

शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात बहुतांशी आदिवासी वस्ती असून हा भाग डोंगराळ व दुर्गम आहे. बहुतांश गावांमध्ये अस्तित्वातील पाणीपुरवठा योजनांचे स्त्रोत भूजलावर अवलंबून आहेत आणि उन्हाळ्यामध्ये स्त्रोत कोरडे पडत असल्याने या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो.

ग्रीड पद्धतीने पाणीपुरवठा करणाऱ्या या योजनेस मान्यता मिळाल्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या