Tuesday, May 7, 2024
Homeधुळेकोरोनाचा फटका : दीडशे रुपयात दोन कोंबड्या

कोरोनाचा फटका : दीडशे रुपयात दोन कोंबड्या

पिंपळनेरात ट्रॅक्टरभरून विकल्या कोंबड्या घेणार्‍यांची उडाली झुंबड

पिंपळनेर

कोरोना व्हायरलचा पोल्ट्री फॉर्मवाल्यांना फटका, बाहेर मार्केटींग नसल्याने आज पिंपळनेर आठवडे बाजारात 150 रुपयात 2 कोंबड्याची विक्री घेणार्‍यांची एकच झुंबड.

- Advertisement -

कोरोना व्हायरलमुळे पोल्ट्री फार्मवाल्यांच्या मालाचा शहरात विक्री होत नसल्याने पोल्ट्रीफॉर्ममध्ये दोन किलो, तीन किलोच्या कोंबड्या तयार झाल्यात. विक्री होत नाही म्हणून हतबल झालेल्या पोल्ट्रीधारकांनी आता सरळ आठवडे बाजारातच कोंबड्यांची ट्रॅक्टर भरुन आणल्या व 150 रुपयात सरसकट दोन कोबड्यांची विक्री सुरु केली.

जेबापूर येथील आनंद अ‍ॅग्रोने ही विक्री पिंपळनेरच्या बाजारात विक्री लॉट लावला होता. यावेळी नागरिकांसह चिकन टीक्का विक्रीधारकांनी कोंबड्या घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. प्रत्येक जण दोन-दोन कोंबड्या घेवून जात होते. तर चिकन टीक्का विक्रेत्यांनी एक गठ्ठा 20-20 ते 25 कोंबड्या खरेदी करत होते. यावेळी पोल्टीधारक म्हणाले बाहेर विक्री नाही तर खाणार्‍यांना तरी स्वस्तात देवू व कोरोनाची भितीही दूर होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या