Friday, May 3, 2024
Homeनगरप्राथमिक शिक्षक बँक निवडणुकीत अवतारणार नव्याने ‘स्वराज्य’ मंडळ !

प्राथमिक शिक्षक बँक निवडणुकीत अवतारणार नव्याने ‘स्वराज्य’ मंडळ !

गुरूजींच्या राजकारणाला मिळणार कलाटणी; जिल्हाध्यक्षपदी नाबगे, सरचिटणीसपदी नेटके

अहमदनगर (प्रतिनिधी)- तिथीनुसार येणार्‍या शिव जयंतीच्या पूर्वसंध्येला नगर प्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणात मोठी घडामोड होणार आहे. सततच्या बदलत्या भूमिका सभासदांना कायमच गृहीत धरत त्यांच्या अपेक्षा पुर्ण न करणार्‍या आणि स्वतःच्या राजकीय भांडणात सभासदांची लूट होत असताना गप्प बसणार्‍याच्या विरोधात प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत स्वराज्य मंडळ स्थापन होवून सभासदांना सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रयत्नांना जिल्हाभरातील अनेक तटस्थ सभासदांचा पाठिंबा आहे. यामुळे प्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळणार आहे.

- Advertisement -

नव्यान स्थापन होणार्‍या स्वराज मंडळात शिवरायांची प्रेरणा घेत सर्वसमावेशक धोरण अवलंबिले जातील, यात खुलेपणाने सर्व सभासदांचे स्वागत असेल, लोकशाही मार्गाने मार्गक्रमण करत प्राथमिक शिक्षक बँकेत या नव्या मंडळाचे स्वराज्य स्थापन होईल अशी भावना सभासदांनी बोलून दाखवली. सभासदांना कायमच गृहीत धरणं आणि प्रत्येक वेळी सभासदांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवून याच खदखदीमधून सभासदांना नवीन पर्याय उपलब्ध झालेला आहे.

नवीन मंडळाच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित बैठकीला जिल्हाभरातून अर्जुन तळपाडे, प्रशांत गवारी, रुपेश वाकचौरे, रोहिदास जाधव, सदानंद चव्हाण, जयश्री भोसले (अकोले) नीलेश हारदे, विकास खेबडे, वृंदा तेलोरे, योगेश थोरात, प्रवीण गाडेकर, नितीन केंगार, खंडू कोळपे (संगमनेर) निलेश राजवळ, एकनाथ रहाटे, सोमनाथ शेंडे, (श्रीरामपूर) वसंत भातकूडव, लक्ष्मीकांत वाडीले, लतीफ पठाण, स्मिता डूबे (कोपरगाव) प्रकाश मुरकुटे, सुभाष चव्हाण, सुभाष भांड, नितीन दळवी, राजू आडे, अंबादास कोरडे, विशाल कुलट, प्रेरणा सरदार (नेवासा) मच्छिंद्र कदम, शरद कोतकर, अरविंद थोरात, नानासाहेब गाढवे, संतोष सरोदे, प्रवीण खाडे (नगर)

राजेंद्र ठोकळ, भाऊसाहेब पाचारणे, देविदास फुंदे, अरुण पठाडे (शेवगाव) भाऊसाहेब गिरमकर, नितीन भोईटे, संदीप खाडे, संदीप कवडे, शरद गावडे (श्रीगोंदा) अमोल भंडारी, देवेंद्र आंबेडकर, राज चव्हाण, विजय शिंदे (पाथर्डी) विनोद देशमुख, अशोक जाधव, नितीन गारुडकर, नितीन पवार, राज कदम, निर्मला रसाळ (कर्जत) किशोर जगताप, संदीप वाघमारे, विवेक गिरी, चांगदेव डोंगरे, वैभव गोसावी, दीपा सातपुते, राजू बनसोडे, राहुल पुरी, संतोष बोडखे, वेंकट जाधव (राहता) चंद्रकांत गट, अमोल साळवे, अमोल सोनवणे, अमोल दळवी, सोन्याबापु भांड, अमोल लोंढे (पारनेर) अविनाश नवसरे, रामहरी बांगर, अतुल कोल्हे, गणेश नेटके, (जामखेड) असे अनेक सभासद उपस्थित होते. आतापर्यंत सभासदांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी बँकेच्या सत्तेमध्ये बदल करण्याची वेळ आली असून अनेक पदाधिकारी ज्येष्ठ मंडळी आमच्या संपर्कात असून पुढील वर्षभरात ते स्वराज्याच्या छताखाली दाखल होतील, अशी माहिती स्वराज्याचे नेते बाजीराव मोढवे व केशव कोल्हे यांनी यावेळी दिली.

बैठकीत मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन नाबदे, सरचिटणीसपदी प्रतिक नेटके, मच्छिंद्र भापकर (शेवगाव) यांची कोषाध्यक्ष तर सतीश पटारे (राहाता) कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहेे.

- Advertisment -

ताज्या बातम्या