Friday, May 3, 2024
Homeनाशिक5 ठिकाणी चित्रपट, नाट्यगृह, जिम, बंद

5 ठिकाणी चित्रपट, नाट्यगृह, जिम, बंद

नगरमध्येही कोरोनाचा रुग्ण : दिल्लीत महिलेचा मृत्यू

मुंबई – 

राज्यात करोनाचे 18 रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर येथील जीम, सिनेमागृहे, जलतरण तलाव, नाट्यगृहे आज मध्यरात्रीपासून बंद करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली. नगरमध्येही कोरोनाचा रुग्ण आढळला आला आहे. तर शुक्रवारी दिल्लीत एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत करोनाबाबतचे निवेदन दिले. राज्यात करोनाचे एकूण 17 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी दहा रुग्ण पुण्यातील आहेत. मात्र, या 17 रुग्णांमधील करोनाची लक्षणे गंभीर नाहीत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

तसेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर येथील जिम, सिनेमागृहे, जलतरण तलाव, नाट्यगृहे आज मध्यरात्रीपासून बंद करण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या