Friday, May 3, 2024
Homeनाशिककांदा दरात दोनशे ते अडीचशे रुपयांनी घसरण; केंद्र शासन जबाबदार

कांदा दरात दोनशे ते अडीचशे रुपयांनी घसरण; केंद्र शासन जबाबदार

नाशिक । कांद्याचे बाजार भाव वाढल्यानंतर ज्या तात्काळ प्रभावाने केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली. तेवढीच तत्परता कांद्यावरील निर्यातबंदी हटवण्यासाठी सरकारने दाखवली नाही. यामुळे कांद्याचे दर प्रती क्विंटल दोनशे ते अडीचशे रुपयांनी कोसळले असल्याच्या प्रतिक्रीया कांदा उत्पादकांनी व्य्क्त केल्या.

देशभरातून 15 मार्चपासून कांदा निर्यात सुरू झाली खरी मात्र,ही निर्यात खुली होऊनही दैनंदिन दर कोसळतच आहेत. धरसोड धोरणामुळे कांद्याचे दर घसरत असल्याचे चित्र जिल्हाभरात आहे. कांदा निर्यात खुली करावी, यासाठी नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकर्‍यांनी आंदोलन केले. त्यामुळे केंद्र सरकारला निर्यात खुली करावी लागली. 15 मार्चपासून कांद्याची निर्यात बांग्लादेश,नेपाळ, श्रीलंका, सिंगापूर, दुबई आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये सुरू झाली आहे. सध्या भारतात मोठा धुमाकूळ घातला आहे. त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येत असून परिणामी जिल्ह्यात लासलगाव, पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा दरात घसरण झाली आहे.

- Advertisement -

कांद्याची निर्यात बंदी उठणार असल्याच्या दहा-बारा दिवसांपूर्वीच केंद्र शासनाने जाहीर केले होते.त्यामुळे बाजार भाव वाढतील अशी शेतकर्‍यांना अपेक्षा होती.त्यामुळे उत्पादकांनी मोठ्या प्रमाणात कांदा साठविला.हा कांदा सोमवारी विविध बाजार समित्यांमध्ये शेतकर्‍यांनी विक्रीस आणल्यामुळे सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठी आवक झाली.आवक वाढल्यामुळे कांद्याचे दर प्रतिक्विंटल दोनशे ते अडीचशे रुपयांनी घसरले.यामुळे कांदा उत्पादकांमध्ये कमालीची नाराजी आहे.

उन्हाळ कांद्याला जास्तीत जास्त 1790 तर कमीत कमी 1000 आणि सरासरी 1600 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे.लाल कांद्याला 900 ते 1786 रुपये पर्यंत तर सरासरी पंधराशे रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याचे बाजार समिती सभापती कडून सांगण्यात आले.

दर घसरणीला केंद्र सरकार जबाबदार
कांद्याचे बाजार भाव वाढल्यानंतर ज्या तात्काळ प्रभावाने केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली.ते वढीच तत्परता कांद्यावरील निर्यातबंदी हटवण्यासाठी सरकारने दाखवली नाही.कांद्याचे बाजार भाव पाडण्यासाठीच सरकारने प्रत्यक्ष कांदा निर्यात करण्यासाठी 15 मार्चची तारीख दिली. पाप सरकारचे आणि नुकसान शेतकर्‍यांचे कांदा दरातील होणार्‍या नुकसानीची केंद्र सरकारकडून भरपाई घेण्यात येईल.
-भारत दिघोळे, अध्यक्ष राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

भाव वाढण्याची शक्यतां नाही
निर्यातबंदी हटवण्याची 15 तारीख द्यायला नको होती.15 तारखेनंतर आवक वाढणार आणि भावात घसरण होणार हे निश्चितच होते.अजुनही किमान दिवस भाव वाढण्याची शक्यतां नाही.
संदीप मगर, शेतकरी

- Advertisment -

ताज्या बातम्या