Saturday, May 4, 2024
Homeनाशिकनाशिकमधील पान सुपारीची दुकाने ३१ मार्चपर्यंत बंद राहतील – जिल्हाधिकारी सूरज मांढरे

नाशिकमधील पान सुपारीची दुकाने ३१ मार्चपर्यंत बंद राहतील – जिल्हाधिकारी सूरज मांढरे

file photo

नाशिक |  पान दुकाने अथवा अन्य विक्रीची ठिकाणे जिथून पान, गुटखा व यासारख्या पदार्थांची विक्री होते, तसेच पान शॉप, पान टपरी, पान ठेले यासारख्या ठिकाणांवरुनही या पदार्थांची विक्री होत असते अशी ठिकाणे पूर्णत: बंद ठेवण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सूरज मांढरे, यांनी एका आदेशान्वये दिले आहेत.

- Advertisement -

​नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोना या विषाणूची लागण झालेल्या इतर भागातून तसेच देशातून अनेक नागरिक प्रवास करुन येत आहेत. त्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोना या विषाणूचा संसर्ग हा खोकला, थूंकी याद्वारे होत असल्याचे वैद्यकीय तपासणीअंती सिद्ध झालेले आहे.

पान, गुटखा अथवा त्यासारखे पदार्थ खाऊन नागरिक स्वैरपणे सार्वजनिक ठिकाणी थूंकत असतात. त्यामुळे या विषाणूंचा त्याद्वारे संसर्ग होण्याची दाट शक्यता असल्याने अशा पदार्थांच्या सेवनावर/विक्रीवर बंदी आणणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च पासुन लागु करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी 31 मार्च 2020 पर्यंत पान दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने भारतीय दंड संहिता 1860 (45) चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे गृहीत धरुन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सूरज मांढरे, यांनी आदेशात नमूद केले आहे.

​कोव्हीड-19 चा प्रादर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यामध्ये नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हयात राजकीय, सामाजिक, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रमांना पुढील आदेश होईपर्यंत परवानगी देण्यात येऊ नये याबाबतचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या