Saturday, May 4, 2024
Homeजळगावकोरोना : चाळीसगावकारांनो, कोरोना बाबत गांभीर्याने घ्या…

कोरोना : चाळीसगावकारांनो, कोरोना बाबत गांभीर्याने घ्या…

शनिवारी रेल्वे व बस स्थानकात प्रचंड गर्दी
बस चालक व वाहक भितीच्या सावटाखाली

चाळीसगाव  – 

चाळीसगावात प्रशासनातर्फे कोरोनाफ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. या उपाययोजनांचा भाग म्हणून आणि कोरोनाफ विषाणूची साखळी तोडण्यासाठी रविवार 22 रोजी सकाळी 7 ते रात्री 9 या कालावधीत जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे.

- Advertisement -

करोना विषाणूविरोधातले हे वेगळ्या प्रकारचे युद्धच असल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाच्या संकटाचे गांभीर्य लक्षात आणून दिले आहे. परंतू तरी देखील चाळीसगाव तालुक्यातील 70 टक्के जनतेची कोरोना विषाणू संदर्भात प्रचंड उदासिनात दिसून येत आहे. शासनातर्फे गर्दी न घरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परंतू या आवाहानाल खो देत शनिवारी येथील रेल्वे स्थानक व बस स्थानकात बाहेरगावी जान्यासाठी प्रचंड गर्दी दिसून आली. त्यामुळे चाळीसगावकरांनो कोरोनाबाबत गांभीर्याने घ्या अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी या संकटाच्या काळात सगळ्यांनी शहाणपणाने, समजुतदारपणे वागण्याची आवश्यकता आहे. परंतू चाळीसगावात मात्र 70 टक्के लोक हे कोरोनाबाबत उदासिन दिसून आले. रविवारी जनता कर्फ्यू जाहिर केल्यामुळे आजच आपल्या नातेवाईक व मित्रपरिवाराकडे जावू म्हणून शनिवारी येथील रेल्वे स्थानक व बस स्थानकात प्रचंड गर्दी दिसून आली.

रात्री 12 ते संकाळी 12 वाजेपर्यंत रेल्वेची एक हजार टिकीटे विक्री झाली होती. तर चाळीसगावातून आगारातून 544 पैकी तब्बल 374 बस धावल्यात. आरटीओ कार्यालयाकडून घालुन दिलेल्या 21 प्रवशांच्या निर्बधापैकी 80 ते 100 प्रवाशी बसमध्ये बळजबरीने बसमध्ये प्रवास करीत आहेत. त्यामुळे बस चालक व वाहक शनिवारी संकाळी कमालीचे वैतागाळे होते आमच्या सुरक्षेची काळजी कोण घेणार म्हणून त्यांनी आगार व्यवस्थापक संदिप निकम यांच्याकडे बस बंद करण्याची मागणी केली होती. तिच अवस्था येथील रेल्वे स्थानकावरही असून बाहेरगावी जाण्यासाठी दुपारी प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर एकच गर्दी केली होती. शासनाने जनतेच आवश्यकता असेल तरच बाहेर पडा असे कळकळीचे आवाहन केले आहे. परंतू या आवाहाना चाळीसगावच्या 70 टक्के जनता खो देतांना दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनेच कोठोर भूमीक घेवून गर्दी करणार्‍यावर कारवाई करण्याची गजर असल्याचे सुज्ञ नागरिकांकडून बोलले जात आहे.

सरकारी यंत्रणा, वैद्यकीय यंत्रणा ज्या गांभीर्याने आणि स्वत:च्या जिवाची जोखीम घेऊन काम करते आहे. त्यामुळे त्यांनी लोकांकडून तशी अपेक्षा करणे गैर नाही. दुर्दैवाने आपल्याकडे लोकांना स्वत:च्या जिवावर येईपर्यंत कशाची काळजी वाटत नसते आणि सार्वजनिक जीवनात जबाबदारीने व्यवहार कसा करायचा याचे भानही अनेकांना नसते. गेले तीन दिवस सरकार सातत्याने गर्दी टाळण्याचे, प्रवास टाळण्याचे आवाहन करीत असतानाही चाळीसगावातील बसेस व रेल्वे स्थानकावरील गर्दीवर फारसा परिणाम झालेला दिसत नाही.

यापैकी किती जणांना बाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही आणि किती जण अद्यापही प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेत नाहीत, हे कळण्यास मार्ग नाही. विनाकारण प्रवास करून इतरांचे आरोग्य धोक्यात आणणार्‍यांविरोधात रेल्वेने आणि पोलिसांनीही पावले उचलण्याची आवश्यकता आहे, सुट्टी मिळाली म्हणून फिरायला बाहेर पडणार्‍यांनी, खरेदीसाठी भटकणार्‍यांनीही स्वतला आवर घालून कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्याची आवश्यकता भासणार नाही हे पाहिले पाहिजे. सरकार कळकळीने सांगतेय त्याचे कारण जगभरात या विषाणूने जो हाहाकार उडवलाय त्याचे भीषण चित्र नजरेसमोर आहे. आपल्याकडे पहिल्या टप्प्यातून दुसर्‍या टप्प्यात जाताना साधारण तशीच परिस्थिती आहे. तिसर्‍या टप्प्यात नेमके काय वाढून ठेवलेले असेल याचा कुणालाच अंदाज नाही.

चाळीसगाव तालुक्यताल ग्रामीण भागातील जनतेला अजुनही कोरोना विषाणू काय आहे, याबाबत पुरेशी माहिती नाही, त्यामुळे ते बिधास्त घराबाहेर पडत आहे. ग्रामीण भागात अजुनही कोरोनाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. तसेच शहरातील बरेच लोक देखील आवश्यकता नसतांना घराबाहेर पडत आहेत. कोरोना चाळीसगाव शहरात दाखल होऊ नये म्हणून चाळीसगावकरांनी कोरोनाबाबत खबरदारी घेण्याची गरज आहे, नाही तर भविष्यात कोरोनाचे दुष्परिणाम भोगण्या शिवाय पर्याय राहणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या