Saturday, May 4, 2024
Homeनंदुरबारकोरोना : तळोद्यात डॉक्टर रेनकोट घालून तपासताहेत रुग्ण

कोरोना : तळोद्यात डॉक्टर रेनकोट घालून तपासताहेत रुग्ण

तळोदा  – 

कोरोना व्हायरसच्या धास्तीने राज्यातील अनेक शहर, तालुक्यांमध्ये डॉक्टरांनी आपली खासगी रुग्णालये बंद केली होती. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या आवाहनानंतर काही डॉक्टरांनी आपल्या सेवा सुरू देखील केल्या.

- Advertisement -

परंतू डॉक्टरांच्या मनातील कोरोनाची भीती कायम आहे.  सदर डॉक्टर अक्षरशः रेनकोट घालून रुग्णांवर उपचार करत आहे. परंतू डॉक्टरांना कोरोनाची तपासणी करण्यासाठी ज्या किट दिल्या जातात, तशाच किट आम्हाला देखील देण्यात याव्या अशी खासगी डॉक्टरांची मागणी आहे.

तळोदा शहरातील डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी दवाखाने उघडले तरी सुरक्षा म्हणून त्यांच्याकडे आवश्यक ती ड्रेस किट नाही. त्यामुळेच ते रेनकोट घालून रुग्णांवर उपचार करत आहेत.

तळोदा डॉक्टर संघटनेकडून आवश्यक ते आधुनिक सुरक्षा कपडे उपलब्ध करून देण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. याकडे शासनाने लवकर लक्ष दिले नाही म्हणत डॉक्टरांनी हा जुगाड सुरू केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या