Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याटिकटॉक कडून कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी १०० कोटींची मदत

टिकटॉक कडून कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी १०० कोटींची मदत

मुंबई : कोरोनाविरुद्ध मुकाबला करण्यासाठी देशातील अनेकजण सढळ हाताने मदत करीत आहेत. आता या युद्धात ‘टिक-टॉक इंडिया’ देखील सामिल झाले आहे. त्यांनी तब्बल १०० कोटी रुपयांची मदत पंतप्रधान सहाय्यता निधीला देऊ केली आहे

दरम्यान देशात कोरोना विषाणूचा फैलाव अतिवेगाने होऊ लागला आहे. ज्यामुळे संपूर्ण देशाला अर्थिक संकटाला सामोरे जावा लागत आहे. यातच टिक-टॉक इंडियाने देखील भारताला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कोरोना विषाणूशी लढण्यासाठी टिक-टॉक इंडियाने उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी तब्बल ४० हजार हजमत मेडिकल प्रोटेक्टिव्ह सूट आणि २ लाख मास्कची मदत करणार आहे. अशा प्रकारे टिक-टॉक कंपनी १०० कोटी रुपयांची मदत करत आहे

- Advertisement -

देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाने सर्वांना हैराण करून सोडले आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. तसेच कोरोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती ढासळू लागली आहे.

यातच कोरोना विषाणूला लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती व संस्थानी आपले योगदान द्यावे, असे आवाहन केले होते. नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला संपूर्ण देशातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. कलाकारांपासून सर्वसामान्य लोकांपर्यंत अनेक जण आपल्या आर्थिक क्षमतेनुसार सरकारला मदत करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या