Saturday, May 4, 2024
Homeनगरलॉकडाऊनमुळे कुरिअर कंपन्यांचे हाल बेहाल !

लॉकडाऊनमुळे कुरिअर कंपन्यांचे हाल बेहाल !

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- लॉकडाऊनच्या दुसर्‍या टप्प्यात सोमवार पासून कुरिअर व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली असली तरी सध्या फक्त अति महत्वाच्या वस्तूंसाठी ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अडचणी येत असल्याने सध्या तरी कुरिअर कंपन्यांचे हाल बेहाल अशीच स्थिती आहे.

सध्य परिस्थितीमध्ये बस, रेल्वे आणि हवाई सेवा आणि सर्व कार्गो सेवा बंद आहेत. अशा परिस्थितीमध्ये व्यवसाय चालू केला तरी त्याला प्रभावी रूप देऊ शकणार नाही. कुरिअर कंपन्यांचे खर्च देखील खूप आहेत. दुकान, गोडाऊनचे भाडे, कर्मचारी, डिलिव्हरीचा खर्च, वाहतुकीचा खर्च त्यातच बाजारपेठ बंद असल्याने कुरिअर करण्यासाठी देखील ग्राहक येताना दिसत नाही.

- Advertisement -

सध्या बाजारपेठ बंद असल्यामुळे डिलिव्हरी देणे सुद्धा शक्य नाही. या व्यवसायाशी निगडित व्यापारांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत परिवहन सेवा सुरळीत होत नाही तोपर्यंत हा व्यवसाय रुळावर येणे अवघड आहे. म्हणजेच जोपर्यंत लॉकडाऊन पूर्णपणे उघडत नाही तोपर्यंत कामकाज पूर्णपणे चालू करू शकत नाही.
दरम्यान, पाऊणे दोन महिन्यांपासून कुरिअर सेवा ठप्प आहे.

आता प्रशासने ही सेवा सुरू केली आहे. मोठ मोठ्या शहरात कुरिअर सेवेचे कार्यालय सुरू झाले आहे. परंतु कुठल्याही वाहतूक सुविधा उपलब्ध नसल्याने ही सेवा देता येत नाही. प्रशासने किमान पाच तास जरी सर्व दुकान, कार्यलय सुरू केले तर ही सेवा सुरू होईल. सर्व कार्यालय, दुकाने उघडल्या नंतर 15 दिवसांनी ही सेवा सुरू करता येईल याबाबत प्रशासने निर्णय घ्यावा, अशी मागणी क्यूईक कुरिअरचे राजेश ठकर यांनी केली आहे.

मुंबई, पुणेसह शहरातील जोपर्यंत व्यवहार सुरळीत होत नाही तोपर्यंत कुरिअर सेवा चालू होणे शक्य नाही. ही सेवा चालवणारे खरे कामगार निघून गेली आहे. तसेच लॉकडाऊनमुळे कार्यालय बंद आहे. विमान सेवा, वाहतूक सेवा जोपर्यंत बंद आहे तोपर्यंत कुरिअर सेवा सुरळीत होऊ शकणार नाही.
– शिरीष झंवर, कुरिअर व्यावसायिक

ज्या प्रकारे बाकीचे उद्योग प्रभावित झाले आहेत. त्याचा सरळ परिणाम हा कुरिअर व्यवसायावर झाला आहे. जोपर्यंत कंपन्या पूर्णपणे चालू होत नाही तसेच रेल्वे मार्ग, सडक मार्ग, हवाई मार्ग चालू होतील म्हणजेच लॉकडाऊन पूर्णपणे उघडल्या नंतरच काम पूर्णपणे चालू करता येईल.
– प्रशांत पांडे, व्यवस्थापक, श्री अंजनी कुरिअर सर्व्हिस.

- Advertisment -

ताज्या बातम्या