Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशअर्थव्यवस्था रुळावर कशी आणणार?; पंतप्रधान मोदींनी घेतली बैठक

अर्थव्यवस्था रुळावर कशी आणणार?; पंतप्रधान मोदींनी घेतली बैठक

सार्वमत

नवी दिल्ली – करोना संकटामुळे अडचणीत आलेली अर्थव्यवस्था रुळावर कशी आणता येईल यासंदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी बैठक घेतली. लॉकडाउनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्याच्या उद्देशाने परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी कोणते धोरण, रणनीती आखली पाहिजे, तसेच अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी स्थानिक गुंतवणुकीला कसे प्रोत्साहन द्यावे याबाबत बैठकीत चर्चा झाली.

- Advertisement -

या बैठकीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय गृह मंत्री अमित शहा, वाणिज्य व उद्योग मंत्री, राज्यमंत्री आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याची प्रोअ‍ॅक्टीव्ह अप्रोचची आवश्यकता असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेणे फार महत्त्वाचे असल्याचे मोदी म्हणाले. त्याच प्रमाणे त्यांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारांकडून आवश्यक त्या परवानग्या कशा मिळतील, त्याही मर्यादित वेळेत हे पाहणे अत्यंत आवश्यक असल्याच्या सूचनाही पंतप्रधान मोदी यांनी या बैठकीत केल्या.

देशात उपलब्ध असलेल्या औद्योगिक जागा, प्लॉट्स आणि इस्टेट्सवर आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी योग्य ते धोरण आखण्याच्या आवश्यकतेवर या बैठकीत भर देण्यात आल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. यासाठी आवश्यक ती आर्थिक मदतही देण्याची सरकारची तयारी असल्याचे बैठकीच स्पष्ट करण्यात आले.

भारतात फास्ट ट्रॅक मोडद्वारे गुंतवणूक आणण्यासाठी आणि देशांतर्गत व्यापाराला चालना देण्यासाठी राज्यांनी त्यांची रणनीती विकसित करावी आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी अधिक कार्यक्षम व्हावे यासाठी या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या