Friday, May 3, 2024
Homeनाशिकसिन्नर : ‘कणकोरी’त दुसरा रुग्ण पॉझिटिव्ह; तालुक्यातील रुग्ण संख्या नऊ

सिन्नर : ‘कणकोरी’त दुसरा रुग्ण पॉझिटिव्ह; तालुक्यातील रुग्ण संख्या नऊ

सिन्नर : तालुक्यातील कणकोरी येथे दुसरा रुग्ण पॉझिटिव्ह आला असून यामुळे परिसरातील नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

दरम्यान आज आलेल्या अहवालात हे स्पष्ट झाले आहे. या अहवालात कणकोरी येथील असलेला व मुंबईत बेस्टमध्ये नोकरीला असलेला रुग्ण सोमवारी (दि. १८) सिन्नरच्या उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आला होता. त्याला दिसणार्‍या लक्षणांमूळे तातडीने त्याला नाशिकला हलवण्यात आले होते. या रुग्णाचा अहवाल आज (दि.१९) सायंकाळी पॉझीटीव्ह आल्याने तालुक्यातील रुग्णांची संख्या नऊ झाली आहे.

- Advertisement -

यापूर्वी कणकोरीत आढळून आलेल्या रुग्णाशी या रुग्णाचा काहीही संबंध नाही. कणकोरीच्या पहिल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नांदूर शिंगोटे येथील सर्व १५-रुग्णांचे अहवालही आज सायंकाळी निगेटीव्ह आल्याने नांदूर परिसरासह संपूर्ण सिन्नर तालुक्याला दिलासा मिळाला आहे.

तर दुबेरे नाक्याजवळील डॉक्टर चा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला आज घरी सोडण्यात आल्याने सिन्नर शहर करोनामुक्त झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या