Saturday, May 4, 2024
HomeUncategorizedजळगाव जिल्हा 500च्या उंबरठ्यावर

जळगाव जिल्हा 500च्या उंबरठ्यावर

दिवसभरात 24 नवे रुग्ण

जळगाव  –

जिल्ह्यात सोमवारी कोरोना बाधित 24 रुग्ण आढळले. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 492 झाली आहे. जळगावातील तांबापूरमधील एकाचा मृत्यूपश्चात अहवाल पॉझिटिव्ह आला. तर पोलीस कॉलनी (दक्षतानगर) मधील दोन रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 5 जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांचा संख्या 59 झाली आहे.

- Advertisement -

अहवालाचा पहिला टप्पा मंगळवारी सकाळी प्राप्त झाला. यात जळगाव, मुक्ताईनगर, भडगाव, भुसावळ, पाचोरा, अमळनेर, यावल, रावेर येथे स्वॅब घेतलेल्या 273 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल मिळाले आहे. यातील 270 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर तीन रुग्णांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव, रावेर व अमळनेरच्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

दुसर्‍या टप्प्यात 4 रुग्ण

अहवालाचा दुसरा टप्पा दुपारी जाहीर झाला. यात जळगाव येथे स्वॅब घेतलेल्या 29 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यातील 25 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर चार रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील दक्षतानगरातील तीन व तांबापुरातील एका रुग्णाचा समावेश आहे.

तिसर्‍या टप्प्यात सात रुग्ण

जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तींचा तिसर्‍या टप्प्यातील अहवाल सायंकाळी प्राप्त झाले. हे सर्व सात अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये बोरोलेवाडी, सावदा येथील एक, विटनेर येथील दोन, भुसावळ येथील दोन, कोरपावली, (ता.यावल) येथील एक, जळगावातील शाहूनगरामधील एक अशा एकूण सात रुग्णांचा समावेश आहे.

चौथ्या टप्प्यात 8 रुग्ण

जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 36 संशयित कोरोना व्यक्तींचे अहवाल रात्री प्राप्त झाले. यातील 28 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर आठ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगावचे पाच, अमळनेरचे दोन, तर चाळीसगावच्या एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 490 इतकी झाली आहे.

पाचव्या टप्प्यात 2 रुग्ण

रात्री 11 वाजता आलेल्या पाचव्या टप्प्यात 2 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हे दोघेही रुग्ण रावेर तालुक्यातील आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या