Saturday, May 4, 2024
Homeनाशिकतीन दिवसांच्या बंदनंतर बाजार समितीत भाजीपाला भावात सुधारणा

तीन दिवसांच्या बंदनंतर बाजार समितीत भाजीपाला भावात सुधारणा

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक मार्केट कमेटीतील एका व्यापार्‍याचा करोनामुळे मृत्यु झाल्यानंतर रामनगर परिसर, फुलेनगर, क्रांतीनगर, भाजीमार्केट व दिंडोरीरोड परिसर अशा भागात करोना रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस बंद ठेवलेली नाशिक मार्केट कमेटी आता सामाजिक अंतरासह विविध अटींचे पालन करुन लिलाव प्रक्रिया पुर्ववत सुरु झाली आहे. तीन दिवसांच्या बंद मुळे भाजीपाला भावात चांगली सुधारणा झाली आहे. आवक कमी जास्त होत असली तरी असलेली टमाटा, काकडी, ढोबळी मिरची, कारले यांच्या भावात चांगली सुधारणा झाल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

करोनाच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिलाव प्रक्रिया विस्कळीत झाली होती. नंतर भाजीपाला लिलाव पुर्ववत झाला होता. मात्र चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनच्या अंतीम टप्प्यात नाशिक मार्केट कमेटीतील एका व्यापार्‍याचा करोनामुळे मृत्यु झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या व्यापार्‍याच्या संपर्कामुळे मार्केट कमेटी आणि पंचवटी परिसरात अनेकांना बाधा झाल्यामुळे सभापती सपत सकाळे व संचालक मंडळाने २६ ते २८ मे या दरम्यान मार्केट मधील लिलाव बंद ठेवले होते. यानंतर महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीनंतर शासन नियमाचे पालन करी आता मार्केट कमेटीतील लिलाव सुरू झाले आहे. यात भाजीपाला व शेतमाल आवक काहीअंशी कमी झाला आहे.

आवक कमी झाल्यानंतर भाजीपाल्याला काही दिवस चांगला भाव मिळात आहे. यात टॉमेटोची आवक कमी झाल्याने भाव ८७५ रुपयापर्यत गेला आहे. तर ढोबळी मिरची, काकडी, कारले, दोडका आदीच्या भावात चांगली सुधारणा झाली आहे. १ जुन रोजी नाशिक मार्केट कमेटीतून मुंबई व उपनगरांत ३७, कल्याण १९, ठाणे १२, भिवंडी १५, पालघर १० जळगांव ३ व गुजरात १६ अशी १०९ वाहने रवाना झाली.

नाशिक मार्केट कमेटीत ४ दिवसातील भाव स्थिती

भाजीपाला मिळालेला प्रति क्विंटल भाव

 २९ मे       ३० मे           ३१ मे          १ जुन
टमाटा                           १३५०        ७००            ८७५             ७५०
वांगी                             ३५००      २६००           १७५०           ४५००
फ्लॉवर                          १०००        ९८०             ७१५            ७१५
कोबी                               ३७५        ३७५             ५००            ५४०
ढोबळी मिरची                 ३१२५       ३१२५          ३१९०          २६२५
कारले                            २७१०       २०८५          २५०५          २७०५
काकडी                          १६७५        १७००          १८७५          १५००

- Advertisment -

ताज्या बातम्या