Saturday, May 4, 2024
Homeनाशिककरोना योद्ध्यांच्या सुरक्षेसाठी दोघींचा पुढाकार; ‘पॉकेटमनी’तून नाशिक पोलिसांना दिले ‘सुरक्षा कवच’

करोना योद्ध्यांच्या सुरक्षेसाठी दोघींचा पुढाकार; ‘पॉकेटमनी’तून नाशिक पोलिसांना दिले ‘सुरक्षा कवच’

नाशिक | प्रतिनिधी

करोना विषाणू विरूद्धच्या लढ्यात ‘करोना योद्धे’ सर्वात महत्वाचा घटक आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षितता खुप गरजेची आहे. हीच गोष्ट ओळखून नाशिकच्या फ्रावशी इंटरनॅशनल अॅकेडमीत शिकणाऱ्या आदिया आणि आर्या राज लोनसाने या दोघा बहिणीनी यासाठी पुढाकार घेतला आहे. आपल्या जमवलेल्या पैशांतून नाशिक पोलीसांना त्यांनी मोलाची मदत केली आहे. पोलीसांना फेस मास्क, फेस शिल्ड आणि सॅनेटायझर देऊन सुरक्षा कवच दिले आहे.

- Advertisement -

करोना विषाणू विरूद्धच्या लढाईत सामान्य नागरिकांचा कोरोनापासून बचाव करतांना पोलीसांना मात्र कोरोनाची लागण होत आहे. काहीचा मृत्यूही झाला आहे. दुसऱ्यासाठी स्व:ताचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या पोलीसांची काळजी आपणच घ्यायला हवी. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर संवेदनशील असलेल्या आदिया आणि आर्या यांनी आपला सगळा पॉकेटमनी पोलिसांसाठी खर्च करण्याचे ठरविले.

करोनापासून बचावासाठी आवश्यक असलेला फेस मास्क (एन ९५) (१०००), फेस शिल्ड (१००) आणि सॅनेटायझर (५५ लिटर) असे एकूण एक लाख पंचवीस हजारांहून अधिक किंमतीचे साहित्य घेऊन नाशिक पोलीसांना दिले आहे. शहरातल्या गंगापुर रोड, कॉलेजरोड आदी भागात या साहित्याचे वाटप करण्यात आले.

याबाबत बोलतांना आदिया आणि आर्या सांगतात की, आई बाबा आम्हाला पॉकेटमनी देतात. आम्ही नेहमीच त्याची बचत करण्याचा प्रयत्न करतो. मग त्यातून हवी असलेली वस्तू आम्ही विकत घेत असतो. पण आता करोनामुळे सगळच बदल आहे. रोज बातम्यामधून पोलीसांना करोनाची लागण होत असल्याचे पाहात आहोत. मग विचार आला की, ते पोलीस आपली काळजी घेतात मग आपण त्यांची काळजी घेतलीच पाहिजे. सध्या फेस मास्क, फेस शिल्ड आणि सॅनेटायझर यापेक्षा काहीच महत्वाचं असूच शकत नाही. त्यामुळेच आम्ही पोलीस काकांना हेच गिफ्ट केल. 

- Advertisment -

ताज्या बातम्या