Monday, November 11, 2024
Homeनाशिकपेठ : स्वछतेचा संदेश व जनजागृतीसाठी लुईस दासची सायकलवर भारत भ्रमण यात्रा

पेठ : स्वछतेचा संदेश व जनजागृतीसाठी लुईस दासची सायकलवर भारत भ्रमण यात्रा

गाठला पंधरा हजार किलोमीटरचा पल्ला

कोहोर | किसन ठाकरे

- Advertisement -

स्वच्छ भारत मिशन अंतर्गंत जनजागृती व संदेश देण्यासाठी पूर्ण भारत यात्रा भ्रमणासाठी निघालेल्या हरिद्वारच्या लुईस दास याने सायकलद्वारे पेठला पोहचत तब्बल पंधरा हजार कि.मीचा पल्ला गाठला.

उतराखंड राज्यातील हरिद्वार येथील वास्तव्यास असलेला लुईस दास. याने आँक्टोबंर महिन्यात संपूर्ण भारतभर जनतेला जागृत करणेकामी सुका कचरा व ओला कचरा वापरण्यासाठी डस्ट बिनचा नागरिकांनी वापर करावा. यासाठी लुईस दास सायकलीवर प्रवास करीत आहे. त्याने सायकलवर कचरा साठविण्यासाठी डस्ट बिन नचा वापर करावा. असा स्वच्छता दर्शक फलकही लावला आहे.

त्यानंतर देशात डिसेंबंर अखेर कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवायला लागला म्हणून त्याने डस्ट बिन बरोबरच कोव्हिड-१९ चेही फलक सायकलवर लावले. जेणेकरुन देशासाठी व देशातील नागरिकांना सद्यस्थितीत या दोन्हीही बाबींची जनजागृती करणे आवश्यक असल्याची त्याला जाणीव झाली. म्हणून कोरोना जागृतीचे फलक सायकलला लावण्यास लुईस दास विसरला नाही.

ज्यावेळी महाराष्ट्रात करोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्रातील राघव राजपुरे या व्यक्तीने लुईस दासला थांबण्याचा सल्ला दिला. व ते दोन महिने त्यांच्याकडे राहिले. त्याने चोविस राज्यात जनजागृती केली. व महाराष्ट्रात पोहचत तब्बल पंधरा हजार किलो मीटरचा सायकलद्वारे प्रवास केला. लुईस दासला महाराष्ट्रातून पुढे दादरा -नगर हवेली व गुजरात मार्गे मध्यप्रदेश राज्यात व पुढे इतर राज्यात जायचे आहे.

देशातील एकूण २८ राज्यात भ्रमण करावयाचे असल्याने तब्बल वीस हजार कि.मीटरचा प्रवास करावयाचे आहे. यात कोरोनाबाबत हात धुणे, तोंडाला मास्क लावणे, दोन मीटर अंतर ठेवून नागरिकांनी सवांद साधणे, तसेच घनकचऱ्याची विल्हेवाट लावतांना सुका व ओला कचरासाठी डजबीनचा वापर करावा. व कोरोनासारख्या महाभयकंर आजाराला प्रतिबंधक करण्याकामी नागरिकांनी जागरुक रहावे. असे लुईस दास पेठ येथे आलेले असतांना दैनिक देशदूतशी बोलतांना व्यक्त केले.

मी माझ्या राज्यात कॉलेज, शाळा, गावांना भेटी दिल्या असता, ओला व सूका कचराचे विलगीकरण होत नव्हते. व डस्ट बिनचा ही वापरही होत नव्हता. यासाठी माझ्या संपुर्ण राज्यात शाळा, कॉलेज मध्ये जनजागृती करीत होतो. त्यांनतर मात्र व्यापक प्रमाणात जनजागृती व्हावी म्हणून भारतभर भ्रमण करण्याचे ठरविले.
-लुईस दास, हरिद्वार (उत्तराखंड)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या