Tuesday, May 7, 2024
Homeनगरसंगमनेरकर हादरले! एकाच दिवशी तिघींचा करोनाने मृत्यू

संगमनेरकर हादरले! एकाच दिवशी तिघींचा करोनाने मृत्यू

संगमनेरात आणखी 5, राहात्यात आणि नगरमध्ये प्रत्येकी 2 पॉझिटिव्ह

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा आता 226 वर पोहचला आहे. मंगळवारी दुपारी दोन टप्प्यात आलेल्या अहवालात जिल्ह्यात आणखी 9 करोना बाधित आढळले आहेत. तर संगमनेर येथील बाधित दोन महिलांचा नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच यापूर्वी करोना पॉझिटिव्ह आलेली 63 वर्षीय महिलेचाही (शेडगाव, मुंबईहून आलेली) आज नगर येथील सामान्य रूग्णालयात मृत्यू झाला असल्याची माहिती स्थानिक तालुका प्रशासनाने दिली आहे. एकाच दिवशी तीन महिलांचा मृत्यू झाल्याने संगमनेरकर हादरले आहेत. काल नव्याने बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये संगमनेरमध्ये 5, राहाता 2 आणि नगर शहरातील दोघा करोना बाधितांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात करोना संसर्गाची साखळी तुटण्याचे नाव घेताना दिसत नाही.

- Advertisement -

सोमवारी दिवसभरात जिल्ह्यात करोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नव्हता. त्यानंतर काल मंगळवारी सकाळी जिल्हा रुग्णालयातील करोना तपासणी प्रयोग शाळेतून आलेल्या तपअहवालात 26 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. यात कोपरगावमधील 18, नगर शहर 6, शेवगाव आणि नगर तालुका प्रत्येकी एक यांचा समावेश होता. मात्र, त्यानंतर काही तासात पुन्हा दुपारी दीडच्य सुमारासह जिल्ह्यात नव्याने 6 कारोना बाधित रुग्ण समोर आले. त्यानंतर पुन्हा जिल्हा आरोग्य प्रशासनाने आणखी 3 करोना पॉझिटिव्ह आल्याचे जाहीर केले. यामुळे दिवसभरात जिल्ह्यात नव्याने 9 करोना बाधित समोर आले. यासह सायंकाळी सातच्या सुमारास संगमनेरच्या दोघा करोना बाधित महिलांचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे जाहिर करण्यात आले.

मंगळवारी दिवसभारात पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये संगमनेर शहरातील मदिनानगर येथील 23 वर्षीय महिला, पुणानाका नाईकवाडपुरा येथील 35 वर्षीय व्यक्ती, जी यापूर्वीच्या बाधित रुग्णाच्या संपर्कात आली होती. तिला करोनाची लागण झाल्याचे समोर आले. यासह मदिनानगर येथील 52 वर्षीय व्यक्तीला देखील करोना पॉझिटिव्ह आला आहे. हा व्यक्ती ड्रायव्हर म्हणून काम करत करत असून बंगळूरू येथून आला होता. तसेच मोमीनपुरा येथील 30 वर्षीय व्यक्ती आणि मुंबईहून संगमनेर येथे आलेला 18 वर्षीय युवक कोरोना बाधित असल्याचे समोर आले. दिवसभरात संगमनेरमध्ये नव्याने पाच बाधित आढळले.

राहाता तालुक्यातील आणखी दोघेजण करोना बाधित झाले असून लिमगाव निघोज येथील 23 वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे, तर शहरातील बोठे गल्ली येथील 36 वर्षीय व्यक्ती करोना बाधित आहे. नगर शहरातील पाचपीर चावडी माळीवाडा येथील एकूण 69 वर्षीय व्यक्ती ही यापूर्वी बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्याला करोनाची लागण झाली आहे. तर पाचपीर चावडी (माळीवाडा) येथील 23 वर्षे युवकाला कोरोनाची बाधा झाली आहे.

तसेच करोना पॉझिटिव्ह असलेल्या संगमनेर येथील 63 आणि 65 वर्षीय महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती काल सायंकाळी जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. या दोन्ही महिलांना अती उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केल्यापासून व्हेंटिलेटर वर होत्या. काल सकाळी त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली. संगमनेर शहरातील असलेल्या या महिला 6 जून रोजी बाधित आढळून आल्या होत्या. तेव्हापासून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते.

आणखी पाच रुग्णांची करोनावर मात
जिल्ह्यात आतापर्यंत 141 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यातील पाच रुग्ण काल करोनामुक्त झाल्याने त्यांना वैद्यकीय तपासणी नंतर बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये अकोले, शेवगाव आणि संगमनेर येथील प्रत्येकी एक तर नगर महापालिका क्षेत्रातील 2 रुग्णांचा समावेश आहे.

अ‍ॅक्टिव्ह केसेस 74
जिल्ह्यात मंगळवारीअखरे 226 करोना बाधित असून यातील 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले. यासह जिल्ह्यात सध्या 74 अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत आतापर्यंत जिल्ह्यात महानगरपालिका क्षेत्र 49, उर्वरित जिल्हा 117, इतर राज्य 2, इतर देश 8 इतर जिल्हा 50 असे करोना बाधित आहेत. जिल्ह्यातील संशयीत करोना 3 हजार 122 व्यक्तींचा स्त्राव नमुेन तपासण्यात आले आहेत. यातील 2 हजार 841 निगेटिव्ह असून 7 अहवाल येणे बाकी आहेत.

करोना संक्रमिताचा राहात्यात पहिला बळी

शिर्डी (प्रतिनिधी)- राहाता तालुक्यातील निमगाव कोर्‍हाळे येथील महिला ही मागील काही दिवसांपूर्वी जुलाब, उलट्या हा त्रास हा त्रास होत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र सावळीविहीर या ठिकाणी उपचार घेण्यासाठी गेली होती. सदर महिलेवर उपचार देखील केले. नगर येथे उपचार सुरू असताना या महिलेचा करोनामुळे मृत्यू झाल्याने निमगाव कोर्‍हाळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. हा राहाता तालुक्यातील करोना आजाराचा पहिला बळी आहे.

निमगाव कोर्‍हाळे गावात सापडलेल्या भाजी विक्रेता महिलेला करोना महिला करोनामुक्त झाली असताना निमगाव कोर्‍हाळे गावातील जवळपास 21 लोकांना क्वारंटाईन केले होते. यातील काही रुग्णांना काल मंगळवार दि. 9 जून रोजी सगळ्याना डिस्चार्ज देण्यात आला. 3 तारखेला जुलाब व इतर आजाराचा त्रास होत असलेल्या 55 वर्षांची महिला सावळीविहीर येथे आली होती. 5 तारखेला राहाता येथून नगर येथे हलवलेल्या महिलेला करोनाची लागण झाली होती. तिला फुफ्फुसाचा देखील त्रास होत होता नगर येथे उपचार सुरू असताना या महिलेचा 9 जुन रोजी मृत्यू झाला अशी माहिती सावळीविहीर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीधर गागरे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या