Saturday, May 4, 2024
Homeनाशिककोविड टेस्ट शिबिराचे जुन्या नाशकात आयोजन

कोविड टेस्ट शिबिराचे जुन्या नाशकात आयोजन

जुने नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरात ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या जुने नाशिक परिसरातील सामान्य लोकांची लवकरात लवकर करोना टेस्ट होऊन त्यांना उपचार मिळावा यासाठी प्रभाग क्रमांक 14 च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका समीना मेमन यांनी विशेष पुढाकार घेऊन भद्रकाली पोलीस ठाण्याच्या शेजारील शाळेत महापालिकेच्या सहकार्याने मोफत विशेष कोविड टेस्ट शिबिराचे आयोजन केले आहे.

- Advertisement -

यामध्ये अवघ्या दोन दिवसात सुमारे दीडशे लोकांनी तपासणी करून घेतली. यामध्ये मोठ्या संख्येने लोक निगेटिव्ह आले तर ज्या लोकांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आले.

त्यांना पुढील उपचारासाठी त्वरित मार्गदर्शन करण्यात येऊन उपचारार्थ दाखल करण्यात आले, अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व सामाजिक अंतराचे भान ठेवून हे शिबिर सुरू आहे.

जुने नाशिक परिसरातील लोकांचे आरोग्य तपासणी होऊन जे लोक करुणा बाधित आहेत त्यांना त्वरित वेगळे करण्यासाठी हे शिबीर अत्यंत उपयोगी ठरत आहे. यामुळे इतरांना देखील त्रास होणार नाही.

मोफत तपासणी होत असल्यामुळे या ठिकाणी नागरिक स्वतःहून तपासणीसाठी येत आहेत. आगामी काळात देखील हा शिबिर सुरू राहणार असून नागरिकांना त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेविका मेमन यांनी केले आहेत. दरम्यान, मेमन यांच्या या उपक्रमामुळे जुने नाशिकरांनी समाधान व्यक्त केले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या