उमराणे । वार्ताहर Umrane
५ जुलै रोजी एका किराणा व्यापारीची आई वय वर्ष ६५ यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता त्यानंतर आज पुन्हा १३ जणांचे सायंकाळी अहवाल प्राप्त झाले त्यात २ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह निघाले आहेत असे देवळा तालुका वैद्यकीय अधिकारी सुभाष मांडगे यांनी माहिती दिली.
नाशिक येथे खाजगी दवाखान्यात उपचार घेत असलेले वडील वय ७० पॉझिटिव्ह आले तर देवळा येथे आईच्या सम्पर्क आलेल्या १२ अहवालात ११ निगेटिव्ह तर स्वतः व्यापारी वय ४० पॉझिटिव्ह आल्याने उमराने गावात चिंता पसरली आहे .
दि ८ उद्यापासून ते १२ तारखेपर्यंत ५ दिवस उमराणे गावात जनता कर्फ्यु पाळण्यात येणारअसून हॉस्पिटल व मेडिकल सोडून कांदा व मका मार्केट सहसर्व व्यवहार ५ दिवस बंद रहाणार असल्याची माहिती माजी सभापती विलास देवरे यांनी दिली असून व्यापारी रहात असलेला पोस्ट परिसर कॅन्टोनमेंट झोन जाहीर करण्यात आले असून ग्रामस्थांनी काळजी घ्यावी असे आवाहन सरपंच लता देवरे यांनी केले आहे.