Friday, May 3, 2024
Homeराजकीयराजस्थान राजकारण : सचिन पायलट दुसऱ्या बैठकीला देखील गैरहजर, गेहलोत सरकारचे संकट...

राजस्थान राजकारण : सचिन पायलट दुसऱ्या बैठकीला देखील गैरहजर, गेहलोत सरकारचे संकट वाढले

नवी दिल्ली – राजस्थानातील rajsthan काँग्रेस सरकारवरील संकट अधिकच गडद झाले आहे. सोमवारी सकाळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत ashok gehlot यांनी बोलावलेल्या पक्ष बैठकीला आपण जाणार नसल्याने उपमुख्यमंत्री सचिन पायलट sachin pilot यांनी स्पष्ट केल्यानंतर पायलट यांच्या गटात 30 आमदार असल्याची माहिती त्यांच्या गोटातून समोर आली आहे. दरम्यान, काँग्रेसच्या गेहलोत गटाने अशी शक्यता पुन्हा फेटाळून लावली आहे.

उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना राज्यसभा निवडणुकीतील कथित राजकीय घोडेबाजाराच्या चौकशीसाठी राजस्थान एटीएसने नोटिस बजावल्यानंतर मुख्यमंत्री गेहलोत यांचे सरकार संकटात आले आहे. पायटल सध्या दिल्लीत आहेत. त्यांची भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू असल्याची माहिती दिवसभर चर्चेत होती. मात्र याबाबत भाजपा किंवा पायलट गटाकडून कोणतीही माहिती समोर आली नाही.

- Advertisement -

पायलट यांच्याशी काँग्रेसचे वरिष्ठ नेते चर्चा करतील, असेही म्हटले गेले. मात्र याबाबतही अधिकृत माहिती समोर आली नाही. या दरम्यान काँग्रेसने राजस्थानात निरीक्षक पाठवून स्थितीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र आता पायलट यांच्याकडून बैठकीलाच जाणार नसल्याची भुमिका घेण्यात आल्याने सोमवारी सकाळी होणार्‍या पक्ष बैठकीचा काही निष्कर्ष निघणार नाही, असे म्हटले जात आहे.

रविवारी सायंकाळी पायलट यांच्यासोबत 30 आमदार असल्याचा दावा करण्यात आला. मात्र हे आमदार कोण, याचा खुलासा झाला नाही. गेहलोत गटाकडूनही पायलट यांच्यासोबत कोणी नसल्याचे वारंवार सांगीतले जात आहे.

भाजपाने 30 आमदार असतील तर आधी राजस्थानातील गेहलोत सरकार पाडा. मग पुढील राजकीय पावले टाकली जातील, असा निरोप पायलट यांना दिल्याची चर्चा होती. तर पायलट यांनी आपण भाजपात न जाता स्वतंत्र पक्ष स्थापन करणार असल्याचा निरोप काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना दिल्याचे सांगीतले जात आहे.

काँग्रेसमधील या पडझडीवर ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल kapil sibbal यांनी केलेले ट्विट दिवसभर चर्चेत होते. ‘तबेल्यातील एकेक घोडा सोडून चाललाय. आपण कधी जागे होणार?’ असा सवाल त्यांनी केला. एकप्रकारे त्यांनी काँग्रेसलाच कानपिचक्या दिल्याचा अर्थ यातून काढला गेला. भाजपा खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला. दिवसभर राजकीय नाट्य वेगात होते.

गेहलोत आणि पायलट यांच्यातील राजकीय संघर्ष विधानसभा निवडणुकीआधीपासून सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून जोरदार कामगिरी केल्यावर मुख्यमंत्री पायलट होतील, असा राजकीय कयास होता. मात्र गेहलोत यांनी बाजी मारली. तेव्हापासून पायलट नाराज होते. पुढे सत्ताधारी पक्षातील बेबनाव आणि अंतर्गत संघर्ष वाढत गेला. आता तो टोकाला पोहचला आहे. याचा परिणाम राजस्थानच्या राजकारणावर कसा होणार? सत्तापालट होणार का? भाजपा काय भुमिका घेणार, याकडे लक्ष आहे.

मी भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे सचिन पायलट यांनी एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला माहिती दिली आहे.

सगळ्या आमदारांसाठी दरवाजे उघडे आहे, राहणार आहे. ज्यांना काही बोलायचं असेल तर सोनिया किंवा राहुल गांधी यांच्याशी चर्चा करा. वैयक्तिक स्पर्धेसाठी काँग्रेस पार्टीला अस्थिर करणे चुकीचे आहे. भाजप सरकार पैशाच्या जोरावर आमदारांची निष्ठा खरेदी न करू शकल्यामुळे आयकर विभागाला हाताशी धरण्यात आल्याचे सांगत रणदीप सुरजेवाला भाजपवर टीका केली आहे. रकार नक्कीच पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

काल रात्रीपर्यंत 115 आमदार आमच्या सोबत होते, आता 109 आमच्या सोबत आहे – मंत्री प्रताप सिंह

राजस्थानचे मंत्री प्रतापसिंह बोलताना म्हणाले, ” केंद्रामधील भाजपा सरकारचा शेवटाची सुरूवात राजस्थान मधून सुरू होणार आहे. राजस्थानचे लोक वाटतंय की मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वात सरकारने कार्यकाळ पूर्ण करावा अशी लोकांची इच्छा आहे. काल रात्रीपर्यंत 115 आमदार आमच्या सोबत होते, आता 109 आमच्या सोबत आहे. आम्ही संख्याबळ जिंकत आहोत.

काँग्रेस आमदाराच्या बैठकीत 107 आमदार असल्याची माहिती मुख्यमंत्री गेहलोत यांचे मीडिया सल्लागार यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत, काँग्रेस नेत्यांसह आमदारांनी जयपूरच्या मुख्यमंत्री निवास स्थानात जमून आपली गेहलोत यांनी ताकद दाखवून दिली आहे.

सचिन पायलट काँग्रेस सोडणार नाही – डी. के. शिवकुमार

सचिन पायलट काँग्रेस सोडणार नाही असा विश्वास काँग्रेसचे संकटमोचक आणि कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी व्यक्त केला आहे. तसेच त्यांना “सच्चा काँग्रेसी” देखील म्हंटले आहे.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकी नंतर सर्व आमदारांना जयपूरच्या हॉटेल फेअरमोंट मध्ये हलवण्यात आले आहे.

उद्या सकाळी पुन्हा 10 वाजता काँग्रेस आमदारांची बैठक – रणदीप सुरजेवाला

सद्य स्थितीवर चर्चा करण्यासाठी उद्या पुन्हा 10 वाजता काँग्रेस आमदारांची बैठक होणार आहे, अशी माहिती रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे.

तसेच ते बोलताना म्हणाले, “आम्ही सचिन पायलट आणि सोबतच्या आमदारांना पण येण्यास सांगितले आहे. आम्ही त्यांना पत्र देखील पाठवणार आहोत. आम्ही त्यांना बैठकीत येऊन चर्चा करण्यास सांगितले आहे. तसेच राजस्थान काँग्रेस सरकारकडे 109 आमदार आहे, सगळ्या आमदारांनी समर्थन पत्र दिले असून भाजपचा सरकार पाडण्याच्या डाव आम्ही मोडून काढू.”

गेहलोत सरकारचा सहयोगी पक्ष ” भारतीय ट्रायबल पार्टी” या पक्षाने सरकारचा पाठिंबा काढला आहे. या पक्षाचे अध्यक्ष महेशभाई वसावा यांनी आपल्या पक्षाच्या दोन आमदारांना तसे पत्र लिहून स्पष्ट निर्देश दिले आहेत आणि बहुमत चाचणीच्या वेळेस उपस्थित न राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. आणि पक्षाच्या आदेशाचे पालन न केल्यास कारवाई करण्यात येईल असे देखील सांगण्यात आले आहे.

सचिन पायलट समर्थक आमदार आणि राजस्थान सरकार मधील मंत्री विषवेंद्रा सिंग यांनी ट्विट एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्या व्हिडिओ मध्ये १६ ते १७ सचिन पायलट समर्थक आमदार बसलेले दिसत आहे. आणि त्यांनी फॅमिली असे कॅप्शन दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या