परदेशी शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी आणि परदेशातील मात्र, महाराष्ट्रात शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक प्रमाणपत्र प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे.
सध्याची कराेना परिस्थिती विचारात घेऊन व त्याचप्रमाणे डिजिटल महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत निश्चित केलेली उद्दिष्टे विचारात घेऊन अशा विद्यार्थ्याकरिता प्रमाणिकरणाची प्रक्रिया अधिकाधिक सुटसुटीत आणि सोपी व्हावी म्हणून आॅनलाइन प्राेसेस सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी https://digitalattestation.mahait.org/ हे पोर्टल उपलब्ध करण्यात आले आहे.
- Advertisement -
याबाबत विद्यार्थ्यांना कळविले जावे, असे निर्देश तंत्रशिक्षण संचालक
डॉ. अभय वाघ यांनी मुंबई, पुणे, नाशिक, आैरंगाबाद, अमरावती व नागपूरच्या तंत्रशिक्षण विभागाच्या सहसंचालकांना कळविले आहे.