Friday, May 3, 2024
Homeजळगाव७० फूटाचा ध्वज घेवून पायी वारी

७० फूटाचा ध्वज घेवून पायी वारी

अमळनेर – Amalner – प्रतिनिधी :

मातंग समाजाचे देवता बावन्नविर बाबा व जैना मातेच्या ध्वजासाठी १० तरुणांनी बेटावद ते एरंडोल तालुक्यातील जळू पर्यंत खांद्यावर ७० फुटाचे मोठे बांबू घेऊन पदयात्रा काढली.

- Advertisement -

एरंडोल तालुक्यातील जळू येथे मातंग समाजाचे बावन्नविर बाबा व जैना माता ही दैवत असून दरवर्षी नवरात्री मध्ये घटस्थापनेच्या वेळी नवीन ध्वज लावले जातात बांबूच्या सुमारे ६५ ते ७० फूट उंच काठ्यांना भगवा कापड लावून गुंडाळून टोकावर ही भगवा ध्वज लावला जातो.

हे ध्वज बेटावद येथील नदी काठावरील बांबू वनातून आणले जातात रवींद्र अवचित्ते ,रोहिदास अंबोरे , संदीप पाखरे , आकाश पाटील , महेंद्र पाटील , तात्या पाटील , हरिसिंग पाटील, सोनू पाटील , प्रवीण बनसोडे ,दीपक नाईक ,हरीदास अंबोरे , बाळू पवार या तरुणांनी दोन्ही बांबू बेटावद येथून खांद्यावर आणून एरंडोल कडे निघाले .

दि १८ रोजी सकाळी ते एरंडोल पोहचतील विशेष म्हणजे कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्स पाळून त्यांनी ७० फुटांचे दोन्ही बांबू खांद्यावरून नेले गेल्या २७ वर्षांपासून लिलाबाई मरसाळे यांनी बेटावद येथून काठी आणण्याची प्रथा सुरु केली आहे.

दरवर्षी जळू येथे यात्रा भरते १२ गाड्या ओढल्या जातात त्यावेळीही ध्वजाची, काठीची पूजा केली जाते मात्र यावर्षी यात्रेवर कोरोनाचे संकट आले आहे .

पितृपक्षची अमावस्या झाल्या नंतर दूसरे दिवशी नवरात्र ऊत्सवाला प्रारंभ होतो मात्र यावर्षी अधिक महिना आल्याने नवरात्री ऊत्सव पूढील महिन्यात सूरू होईल मात्र परंपरेनूसार पितृपक्षातील अमावस्याच्या दूसऱ्या दिवशी हा ध्वज लावला जातो .

४ वर्षा पूर्वी लावलेला हा ध्वज वादळात तूटल्याने यावर्षी नविन काठी आणण्यात आली जग २१व्या शतकाकडे वाटचाल करित असतांनाही सर्वसामान्य जनतेत श्रध्दा व भावना असल्याने आजही अनेक धार्मिक परंपरा सूरूच आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या