Saturday, May 4, 2024
Homeधुळेधुळ्यातील फरशीपुल रहदारीसाठी बंद

धुळ्यातील फरशीपुल रहदारीसाठी बंद

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

अक्कलपाडा धरणाचे तीन दरवाजे अर्धा मिटरने उघडण्यात आले असून पांझरा नदीपात्रात तीन हजार 200 क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे.

- Advertisement -

त्यामुळे पांझरा नदी दुथडी वाहत आहे. खबरदारी म्हणून शहरातील फरशीपुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.साक्री व धुळे तालुक्यात काल रात्री मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नदीनाले वाहू लागले.

पाटबंधारे विभागाने अक्कलपाडा धरणाचे तीन दरवाजे अर्धा मिटरने उघडले असून धरणातून तीन हजार 200 क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे.

या अगोदर पांझरा नदी दुथडी वाहत होती. आता पांझरा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने खबरदारी म्हणून फरशी पुल वाहतुकीसाठी बंद केला आहे. नागरिकांना नदी काठी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तापी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

गिरणा नदीपात्रातून एक लाख क्युसेक्स व हतनूर धरणातून 16 हजार क्युसेक्स पाणी प्रवाह तापी नदी पात्रात सुरू आहे.

अन्य नदी व नाले यांचा एकूण विसर्ग एक लाख 25 हजार क्युसेस पाणी तापी नदी मधून सुलवाडे धरणाव्दारे खालील बाजूस येण्याची शक्यता आहे.

पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज सुलवाडे बॅरेज मधून 35751 क्यूसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे.

पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून त्याची गती वाढल्यास या प्रवाहात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी व पुरपरिस्थीती या कारणामुळे शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील तापी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या