Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे मृतदेह उचलू देणार नाही

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे मृतदेह उचलू देणार नाही

मुंबई | Mumbai

शेतकऱ्यांच्या आत्महत्या किडा-मुंगी यांसारख्या होत आहेत असे सरकारला वाटत आहे त्याच्यामुळे त्याची अजिबात दखल घेतली जात नाही…

- Advertisement -

त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये जर अशा शेतकऱ्यांच्या जिथे कुठे आत्महत्या होतील ते प्रेत तोपर्यंत उचलले जाणार नाही जोपर्यंत शासन आणि प्रशासन यामधील दोन-दोन माणसे असे चार जण त्या प्रेताला खांदा देणार नाही तोपर्यंत ते उचलले जाणार नाही अशी भूमिका यापुढे किसान ब्रिगेड तर्फे घेतल्या जाणार आहे, असा आक्रमक पवित्रा किसान ब्रिगेडचे प्रकाश पोहरे यांनी घेतला आहे.

शेतकऱ्यांच्या भावना आणि मागण्यांबाबत किसान ब्रिगेड च्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन दिले.

ते म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकरी आव्हानात्मक स्थितीचा सामना करत आहेत, साखर, कापूस गाठी या दोन्हीसाठी जागतिक स्तरावर बाजार चांगला नसल्यामुळे आणि ही दोन्ही पिके महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी मुख्य आधार असल्यामुळे नजीकच्या भूतकाळात शेतकऱ्यांना उचित भाव मिळू शकलेला नाही.

नुकतीच भारत सरकारने कांद्यावर आणलेली निर्यात बंदी, हमीभाव न मिळणे, खरेदीचा निरुत्साह यामुळे शेतकरी त्रस्त आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या भावना आणि मागण्यांबाबत किसान ब्रिगेड च्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन दिले.

शेती आणि शेतकरी या संदर्भामध्ये केंद्र आणि राज्य सरकारची बेफिकीर वृत्ती अत्यंत चिंतनीय आहे आणि त्या संदर्भामध्ये राज्यभर आवाज उठवणे हे सध्या अत्यंत गरजेचे झाले आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या किडा-मुंगी यांसारख्या होत आहेत असे सरकारला वाटत आहे त्याच्यामुळे त्याची अजिबात दखल घेतली जात नाही.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा उद्रेक येणाऱ्या दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे आणि म्हणूनच या सगळ्या संदर्भामध्ये व्यापक जनजागृती करिता किसान ब्रिगेडतर्फे मोहीम राबवली जाणार असल्याचे किसान ब्रिगेड चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी सांगितले.

किसान ब्रिगेडनी केलेल्या शेतकऱ्याच्या मागण्या केंद्र सरकार पर्यंत पोहचवणार असल्याचे आश्वासन राज्यपालांनी किसान ब्रिगेडच्या शिष्टमंडळाला दिले. नवीन कृषी कायद्या विषयी किसान ब्रिगेड ची भूमिका राज्यपालांनी समजावून घेतली.

या शिष्टमंडळात प्रकाश भाऊ पोहरे, राष्ट्रीय अध्यक्ष किसान ब्रिगेड, पुरुषोत्तम गावंडे, राज्य अध्यक्ष अविनाश काकडे, राष्ट्रीय समन्वयक , किसान ब्रिगेड, नागपूर, डॉक्टर दत्ता मोरे, नांदेड, डॉक्टर सुरेश कदम यादवराव ठाकरे, चंद्रकांत अवचार, कमलेश काळमेघ, प्रकाश बुटले, ऍड सतीश रोठे हे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या