Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्या‘महिंद्रा’ची ‘ऑल-न्यू थार’ बाजारात

‘महिंद्रा’ची ‘ऑल-न्यू थार’ बाजारात

मुंबई । प्रतिनिधी

महिंद्रा उद्योग समूहाच्या 75व्या वर्धापनदिनी, महिंद्रा अँड महिंद्रा लि. ने बहुप्रतीक्षित एसयूव्ही, ‘ऑल-न्यू थार’ सादर केली…

- Advertisement -

थारच्या दोन मालिका, ‘एएक्स’ व ‘एलएक्स’ ग्राहकांना उपलब्ध झाल्या आहेत. ‘एएक्स’ची प्रारंभिक किंमत 9लाख 80 हजार रुपये आहे तर ‘एलएक्स’ची प्रारंभिक किंमत 12 लाख 49 हजार रुपये(एक्स शोरूम किंमत)ेआहे.

‘ऑल-न्यू थार’च्या ‘क्लासिक सिल्हट’मध्ये तिची समकालीन स्टाईलिंग आहेच, त्याशिवाय, कार्यक्षमता, दररोजच्या प्रवासासाठी आवश्यक असणारा आरामदायीपणा व सुटसुटीतपणा, आधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षितता या सर्व बाबतीत नव्या रुपातील ‘थार’ने मोठी झेप घेतली आहे.

4 फ्रंट-फेसिंग’ सीट्स आणि ‘2+4 साइड-फेसिंग’ सीट्स नवीन ‘ऑल-न्यू’ आसनांचे पर्याय विविध पर्याय आहेत. ‘ड्रिझल रेझिस्टंट 17.8 सेमी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम’, ‘क्रूझ कंट्रोल’, ‘अ‍ॅडव्हेंचर स्टॅटिस्टिक्स डिस्प्ले’ यासह ‘स्पोर्टी फ्रंट सीट’, छतावर बसवलेले स्पीकर्स अशी गाडीची वैशिष्टये आहेत. ऑल-न्यू थार’ची नोंदणी शुक्रवार(दि.2) पासून सुरू झाली.

गाडीच्या सादरीकरण संमारंभात‘महिंद्रा अँड महिंद्रा’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पवन गोयंका म्हणाले, गेल्या काही वर्षांत थार ही गाडी महिंद्राच्या समृद्ध इतिहासाचा एक भाग बनली आहे आणि तिने अनेकांच्या मनात घर केले.

महिंद्रा समूहाच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त गौरवशाली इतिहासाचा आणखी एक अध्याय थारच्या रुपाने लिहित आहोत. नवीन रुपासह, थारच्या चिरंतन आवाहनामध्ये उच्च प्रकारची गुणवत्ता आहे.

कच्च्या रस्त्यांवर ती जेवढ्या सुलभतेने धावते तितक्याच आरामात पक्क्या, रस्त्यांवरून प्रवास करू शकते. थारच्या पारंपरिक चाहत्यांव्यतिरिक्त ती नवीन ग्राहक समूहाला आकर्षित करेल, असा आम्हाला विश्वास आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या