Saturday, May 4, 2024
HomeराजकीयBihar Election 2020 : शिवसेना आता 'या' चिन्हांवर निवडणूक लढणार

Bihar Election 2020 : शिवसेना आता ‘या’ चिन्हांवर निवडणूक लढणार

दिल्ली | Delhi

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना देखील सज्ज झाली आहे. शिवसेनेला निवडणूक आयोगाने बिस्कीट हे चिन्ह दिलं होते. मात्र शिवसेनेने या चिन्हावर नापसंती व्यक्त करत दुसरे चिन्ह देण्याबाबत पत्र लिहिले होते. अखेर निवडणूक आयोगाने शिवसेनेची मागणी मान्य केली आहे. शिवसेना आता ‘तुतारी वाजवणारा मावळा’ या चिन्हावर निवडणूक लढणार आहे.

- Advertisement -

दरम्यान बिहार निवडणकीसाठी शिवसेनेने निवडणूक आयोगाला ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी, गॅस सिलेंडर आणि बॅट तीन पर्याय दिले होते. मात्र, निवडणूक आयोगाने कोणतेच चिन्ह न दिल्याने शिवसेनेने नाराजी व्यक्त केली होती. तसेच निवडणूक आयोगाने दिलेल्या चिन्हाच्या निर्णयावर शिवसेनेने आक्षेप नोंदवणारे पत्रदेखील लिहले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्किटाऐवजी तुतारी वाजवणारा मावळा हे निवडणूक चिन्ह बदलून दिल्याचे काल कळवलं. निवडणूक आयोगाने बदलून दिलेल्या या नव्या चिन्हाला शिवसेनेची पसंती आहे.

“हे” आहेत शिवसेनेचे स्टार प्रचारक

सर्वांचे लक्ष लागून असलेल्या बिहारनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचाही समावेश आहे. याशिवाय शिवसेना नेते सुभाष देसाई, संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई, चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत, गुलाबराव पाटील, प्रियंका चतुर्वेदी, राहुल शेवाळे या महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचा स्टार प्रचारक म्हणून समावेश करण्यात आला आहे.याव्यतिरिक्त राजकुमार बाफना, कृपाल तुमाणे, सुनील चिटणीस, योगराज शर्मा, कौशैलेंद्र शर्मा, विनय शुक्ला, गुलाबाचंद दुबे, अखिलेश तिवारी, अशोक तिवारी यांचा समावेश आहे. हे सर्व नेते बिहार निवडणूकीतील शिवसेनेच्या उमेदवारांचा स्टार प्रचारक म्हणून प्रचार करतील.

बिहार निवडणूक 3 टप्प्यात पार पडणार आहे. 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर या तीन दिवशी मतदान होणार असून 10 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत शिवसेना 50 जागांवर निवडणूक लढवणार आहे. यासाठी जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत, गुलाबराव पाटील, राजकुमार बाफना, प्रियांका चतुर्वेदी, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, सुनिल चिटणीस, योगराज शर्मा, कौशलेंद्र शर्मा, विनय शुक्ला, गुलाबचंद दुबे, अखिलेश तिवारी, अशोक तिवारी अशा 20 जणांचा समावेश आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या