Friday, May 3, 2024
Homeनगरपाण्यात पडून वृद्धेचा मृत्यू

पाण्यात पडून वृद्धेचा मृत्यू

अहमदनगर|Ahmednagar

पुलावरून वाहत असलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात पडून एका वृद्धेचा मृत्यू झाला. मंदाबाई लक्ष्मण पालवे (वय- 80 रा. मेहेकरी ता. नगर) असे मृत वृद्धेचे नाव आहे.

- Advertisement -

मेहेकरी (ता. नगर) गावातील ओढ्यावर ही घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पाऊस सुरू असल्याने नदी, नाल्यांना पूर आला आहे. पाऊस जास्त झाल्याने मेहेकरी गावातून जाणार्‍या ओढ्याच्या वरून पाणी वाहत आहे.

यावेळी मंदाबाई पालवे यांनी पुलाच्या वरून वाहत असलेल्या पाण्यातून जाण्याचा प्रयत्न केला. वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने मंदाबाई या पाण्यात पडल्या. यावेळी स्थानिकांच्या मदतीने त्यांना पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यांना त्यांचा मुलगा बाळासाहेब पालवे यांनी जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतू, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या