Tuesday, May 7, 2024
Homeमुख्य बातम्याआत्मनिर्भर भारत अभियानात सहकारी बँकांचा समावेश करून मुदतवाढ देऊ

आत्मनिर्भर भारत अभियानात सहकारी बँकांचा समावेश करून मुदतवाढ देऊ

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर व्यापार, उद्योग क्षेत्राला आधार देण्याच्या दृष्टीने आत्मनिर्भर भारत योजनेमध्ये जाहीर केलेले तीन लाख कोटी रुपये कर्जाचे पॅकेजमध्ये सहकारी बँकांचा समावेश करून सदर योजनेला मुदतवाढ देण्यासाठी लवकरात लवकर निर्णय घेऊ, असे आश्वासन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिले

- Advertisement -

‘वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली खालील शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली त्याप्रसंगी ते बोलत होते. ललित गांधी यांनी यावेळी व्यापार-उद्योग क्षेत्राच्या अडचणी विशद करताना या क्षेत्राला केंद्राची थेट आर्थिक मदत होणे गरजेचे असल्याचे आग्रही प्रतिपादन केले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील व्यापार उद्योग क्षेत्रातील सहकारी बँकांचा कर्जपुरवठा मोठ्या प्रमाणावर आहे.

परंतु या योजनेमध्ये सहकारी बँकांचा समावेश नसल्याने या योजनेचा कोणताही फायदा त्यांना मिळत नाही. तसेच 31 ऑक्टोबर च्या मुदतीपर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण होणे कठीण असल्याने या योजनेला 31 डिसेंबर 2020 पर्यंतची मुदतवाढ देण्याची मागणीही त्यांनी केली.

अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी यावेळी देशाची अर्थव्यवस्था सकारात्मक दिशेने वाटचाल करत असल्याचे सांगितले.तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेत वेगवेगळ्या माध्यमांतून, येणाऱ्या उत्सवाच्या काळात एक लाख कोटी रुपये चलनांमध्ये येतील, अशा प्रकारे सरकारने नियोजन केल्याचे सांगितले.

तसेच आत्मनिर्भर भारत योजनेतील तीन लाख कोटी च्या पॅकेजमध्ये सुमारे 2 लाख कोटी रुपयांचा कर्जपुरवठा आजअखेर झाला असल्याचे सांगून,उर्वरित रकमेचा सुद्धा या क्षेत्राला विनियोग करता येईल यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत वेस्टन महाराष्ट्र चे उपाध्यक्ष संदीप भंडारी दिल्ली कार्यालयाच्या प्रतिनिधी राघव यांच्यासह सह विविध मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या