Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिककरांना मोठा दिलासा; मृत्यूदर घटला

नाशिककरांना मोठा दिलासा; मृत्यूदर घटला

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महापालिका क्षेत्रात करोना संक्रमणाचा वेगात लक्षणिय घट झाली असुन सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस प्रतिदिन नवीन रुग्णांची संख्या 1000 वर गेली असतांना आता ती ही संख्या 200 च्या आत आली आहे…

- Advertisement -

मागील महिन्याच्या तुलनेत मृत्यु दर घटला असुन आता तो 1.41 टक्के इतका झाला आहे. दरम्यान सरासरी मृत्युचे प्रमाण हे 4 ते 5 पर्यत आले असल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नाशिक शहरातील करोनाचा संसर्गाचे प्रमाणात ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमारात वाढले जाऊन प्रतिदिन 1 हजारापासुन तेराशेपर्यत नवीन रुग्ण समोर येत होते. तसेच मृतांचा आकडा देखील मोठ्या प्रमाणात वाढला गेला होता.

आता आक्टोंबरपासुन नवीन रुग्णांचा आणि मृताच्या आकडेवारीत घट झाली आहे. शहरात आजपर्यत 60 हजार 780 पर्यत करोना रुग्ण गेले असुन मृतांचा आकडा 853 च्यावर गेला आहे. असे असले तरी मात्र गेल्या काही दिवसात नवीन रुग्णांचा आकडा 1 हजारावरून घटून 200 ते 300 पर्यत येऊन ठेपला आहे.

तसेच मृत्युचे प्रमाण घटले आहे. तसेच प्रतिदिन मृत्यु हे 7 ते 8 पर्यत असतांना आता हे प्रमाण 4 ते 5 पर्यत आले आहे. गेल्या दोन दिवसात तर नवीन करोना रुग्णांचा आकडा 200 च्या आत आत आला आहे. यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या जुलै महिन्यात नवीन रुग्णांचा आकडा 200 च्या आत होता, तसेच काहीसे चित्र आता आक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यात दिसुन येत आहे.

महापालिका प्रशासनाकडुन वाढता संसर्ग रोकण्यासाठी गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात शहरात आरोग्य सर्व्हेचे काम डॉक्टरांची पथके वाढवून करण्यात आला. तसेच अ‍ॅटीजेन चाचण्या वाढविण्यात आल्यानंतर आता दररोज अ‍ॅन्टीजेन व करोना चाचण्या 3 हजारापर्यत नेण्यात आल्या होत्या.

शहरातील कोमआर्बिड वृध्द व्यक्तींचा सर्व्हे करण्यात येऊन त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच फिव्हर क्लीनीक व माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम यामुळे संक्रमणाला ब्रेक लावण्यात महापालिकेला यश आले आहे. या एकुणच उपाय योजनांमुळे मृत्यु दर घटला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या