Saturday, May 4, 2024
Homeधुळेमोटार सायकल घसरल्याने तरुण ठार

मोटार सायकल घसरल्याने तरुण ठार

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

मित्रासोबत हॉटेलमधून जेवण आटोपून घरी परत येत असतांना मुंबई-आग्रा महामार्गावर सरवड फाट्या दरम्यान

- Advertisement -

मोटार सायकलीपुढे कुत्रा आडवा आल्याने मोटार सायकल रस्त्याच्या साईडपट्टीनजीक घसरल्याने झालेल्या अपघातात तरुण ठार झाला. योगेश संजय पाटील (वय 22) रा. कापडणे हे मयताचे आहे.

योगेश पाटील व चिराग रवींद्र पाटील हे दि. 27 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजता एमएच 18 एई 3021 क्रमांकाच्या मोटार सायकलीवरुन जेवण करण्यासाठी सोनगीर फाट्यावरील हॉटेल विशाल येथे गेले होते.

त्यांच्या सोबत ऋषिकेश भामरे आणि भूषण पाटील हे दुसर्‍या मोटार सायकलीवरुन आलेले होते. जेवण आटोपून चौघेजण परत येत असतांना रात्री 11.45 वाजता सरवड फाटा दरम्यान अचानक मोटार सायकलीसमोर कुत्रा आडवा आला.

यामुळे योगेशचे मोटार सायकलीवरील नियंत्रण सुटले आणि मोटार सायकल साईडपट्टीजवळ घसरली. यात योगेश खाली कोसळून त्याच्या डोक्याला मार लागला आणि त्याला उलटी झाली. चिराग पाटील आणि त्याच्या मित्रांनी योगेशला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून योगेशला मृत घोषीत केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या