Saturday, May 18, 2024
Homeनगरजिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०१ टक्के

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०१ टक्के

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्ह्यात आज २६७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५३ हजार ८४६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०१ टक्के इतके झाले आहे.

- Advertisement -

दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १८२ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १३७५ इतकी झाली आहे. दरम्यान, प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि महानगरपालिका यांनी चाचण्यांची संख्या वाढविण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५७ आणि अँटीजेन चाचणीत १०४ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १२, अकोले ०२, नगर ग्रामीण ०१, नेवासा ०१, पारनेर ०१, पाथर्डी ०२, राहुरी ०१, इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २२, अकोले ०५, जामखेड ०२, कर्जत ०१, कोपरगाव ०५, नगर ग्रामीण ०१, पारनेर ०१,पाथर्डी ०१, राहाता ०५, राहुरी ०१, संगमनेर ०८, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०९ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १०४ जण बाधित आढळुन आले. यामध्ये मनपा १२, अकोले १३, जामखेड ०९, कर्जत ०९, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण ०३, नेवासा ०५, पारनेर ०२, पाथर्डी १८, राहाता ०३, संगमनेर ०२, शेवगाव १८, श्रीगोंदा ०४ आणि श्रीरामपूर ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ४७, अकोले १३, जामखेड ०८, कर्जत १२, कोपरगाव ०३, नगर ग्रा २०, नेवासा ०९, पारनेर २३, पाथर्डी ३५, राहाता १२, राहुरी ०८, संगमनेर ३३, शेवगाव १३, श्रीगोंदा १९, श्रीरामपूर ०७, कॅंटोन्मेंट ०२, मिलिटरी हॉस्पिटल ०२ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील स्थिती

बरे झालेली रुग्ण संख्या : ५३८४६

उपचार सुरू असलेले रूग्ण : १३७५

मृत्यू : ८६१

एकूण रूग्ण संख्या : ५६०८२

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

- Advertisment -

ताज्या बातम्या