Saturday, May 4, 2024
Homeनगरमतदार संघातील रस्त्यांची कामे प्रत्यक्षात सुरू - आ. कानडे

मतदार संघातील रस्त्यांची कामे प्रत्यक्षात सुरू – आ. कानडे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

यावर्षी थोडासा पाऊस लांबला त्यामुळे पिकांचे जसे नुकसान झाले तसेच रस्तेही अधिक खराब झाले.

- Advertisement -

तथापि रस्त्याच्या दुरवस्थेचा अंदाज घेऊन पाऊस थांबताच मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांचे नियोजन केले.त्यामुळेच मतदारसंघातील किमान 61 गावांतील रस्त्यांच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊ शकली व ठेकेदारांना वर्क ऑर्डरही देता आल्या आणि पाऊस थांबताच मतदारसंघातील सर्व कामे आपण आता सुरू करीत आहोत, असे प्रतिपादन आ. लहू कानडे यांनी केले. दिघी येथील लेखाशीर्ष 2515 मधील रस्त्याच्या कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, ज्येष्ठ नेते जी. के. बकाल, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, बाबासाहेब दिघे, सतीश बोर्डे, आबा पवार, विलास शेजुळ, अमोल नाईक, ब्राह्मणगाव येथे संजय वेताळ, रवींद्र जाधव, नामदेव वाणी, साईनाथ वेताळ, रवींद्र चांदगुडे, निखिल दरेकर, बाबासाहेब निघुट, शरद वेताळ, बापूसाहेब निघुत, इंद्रनाथ पानसरे व सर्व ग्रामस्थ तसेच दिघी येथे सरपंच राधाकृष्ण डांगे, मिननाथ खडके, जनार्दन वाणी, दत्तात्रय डांगे, दगडु डांगे, सार्वजनिक बांधकामचे दत्तात्रय कुलकर्णी व ग्रामसेविका पोळ व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

मी व माझ्या सर्व सहकार्‍यांनी प्रत्यक्ष कामाचे वर्क ऑर्डर झाल्याशिवाय भूमिपूजन करायचे नाही असे ठरवले आहे. येथे कामासाठी येऊन पडलेल्या खडीचे हे प्रमाण आहे. राज्याची आर्थिक स्थिती बिकट असतानाही महत्त्वाच्या रस्त्यांसाठी किमान नऊ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला आहे. मतदारसंघातील 61 गावांमध्ये 10 लाखांपासून ते 25 लाखापर्यंत रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.आज ब्राह्मणगाव वेताळ आणि दिघी येथील रस्त्यांचे भूमिपूजन संपन्न झाले. दर दिवस किमान 5 ते 6 गावांतील भूमिपूजनाचा आराखडा तयार केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या