Saturday, May 4, 2024
HomeUncategorizedअल्पाक्षरी

अल्पाक्षरी

रवींद्र मुकुंदराव मालुंजकर

भन्न दुपारी अचानक ढगांनी गर्दी केली…

- Advertisement -

इतक्या लवकर मेघांना कुणी ही वर्दी दिली…

दुःखाचे फाडून कपडे आकाशी फेकून देऊ…

आणि सुखाचे चार क्षण पांघरून घेऊ…

तुझा माझ्यावर किती आहे विश्वास..?

ती जोवर आहे देहात अखेरचा श्वास…

जगण्याची लढाई चल प्रेमाने जिंकू सारे…

आणि समतेचे वाहू दे अखंड वारे…

गरीब आणि श्रीमंत यातील फरक काय?

गरज संपताच ज्यांना मालक करतात

कायमचा बाय-बाय…

सांगा बरं कोणती व्यक्ती खऱ्या अर्थाने

मानव आहे…तीच…जिच्या मनात

सर्वांबद्दल अंतरीची कणव आहे..!

नाशिकरोड

मोबाईल ९४२३०९०५२६/९८५०८६६४८५.

- Advertisment -

ताज्या बातम्या