Saturday, May 4, 2024
Homeजळगावराकेश सपकाळे खूनप्रकरणातील पाचवा फरार आरोपी जेरबंद

राकेश सपकाळे खूनप्रकरणातील पाचवा फरार आरोपी जेरबंद

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

माजी महापौर अशोक सपकाळे यांचे पुत्र राकेश सपकाळे खून प्रकरणातील पाचवा फरार आरोपीस एलसीबीच्या पथकाने पाळधी येथे जेरबंद केले आहे.

- Advertisement -

तसेच या आरोपीस पुढील चौकशीसाठी जळगाव शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, आकाश मुरलीधर सपकाळे असे फरार आरोपीचे नाव आहे.

शिवाजीनगर परिसरातील स्मशानभूमीजवळ दि.4 नोव्हेंबर रोजी माजी महापौर अशोक सपकाळे यांचे पुत्र राकेश अशोक सपकाळे यांचा पाच संशयित आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून खून केला होता.

या खूनप्रकरणात यापूर्वी चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून संशयित आरोपी आकाश मुरलीधर सपकाळे हा फरार होता.

एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या माहितीवरून विजयसिंह पाटील, जितेंद्र पाटील, राहुल पाटील, प्रीतम पाटील, नितीन बाविस्कर यांनी सापळा रचून धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे आकाश सपकाळे या आरोपीला अटक केली. त्याला पुढील चौकशीसाठी शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या