Saturday, May 4, 2024
Homeभविष्यवेधजन्मतारखेनुसार भविष्य..Future by date of birth

जन्मतारखेनुसार भविष्य..Future by date of birth

किरोच्या नजरेतून – सौ. वंदना अनिल दिवाणे

26 नोव्हेेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनी, गुरू ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य धनु आहे. जीवनात उत्तम प्रगती होईल. अवैध व अनैतिक मार्गाने धनप्राप्ती केल्यास जीवनात अनेक संकटे निर्माण होतील. स्वतःवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवल्यास तुम्ही चांगल्या मार्गाने जाल. आपले ते सारे खरे मानण्याची व करण्याची तुमची वृत्ती राहील. चांगल्या मार्गाचा अवलंब केल्यास मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती होईल. अन्यथा दारिद्र्याच्या गर्तेत कोसळाल.

- Advertisement -

27 नोव्हेेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरू, मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास धनु आहे. सैन्य दलाचे करिअर चांगले राहील. व्यवस्थापन कौशल्य व योजना कृतीत आणण्याची क्षमता चांगली आहे. सरकारी प्रशासन संबंधित खात्यातही उत्तम प्रगती होऊ शकेल. तसेच काहींना उत्तम शल्यविशारद होण्याची संधी मिळेल. आयुष्याच्या सुरूवातीला संघर्ष करून आपल्या जीवनात आर्थिक सुस्थिती प्राप्त करू शकाल.

28 नोव्हेेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरू, हर्षल, सूर्य या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास धनु आहे. सूर्याच्या प्रभावामुळे तुमच्या चेहर्‍यावर एक प्रकारची झळाळी राहील. तुम्हाला राजकारणात उत्तम यश मिळू शकेल. सर्वांशी तुमची वागणूक सहानुभूतीपूर्वक राहील. संभाषणात विनोद पेरण्याची विशिष्ट शैली तुमच्याभोवती हास्याचे कारंजे उडत राहील. त्यामुळे तुमची लोकप्रियता चांगली वाढेल. राजकारणी लोकांना आपल्या पक्षाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी याचा चांगला उपयोग होईल. जीवनात यश प्राप्त होणार असल्यामुळे धनप्राप्तीच्या बाबतीतही यशस्वी व्हाल.

29 नोव्हेेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, नेपच्यून,गुरू या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य धनु आहे. चंद्र कमजोर असल्यामुळे कोणताही निर्णय घेणे कठीण जाईल. स्वतःच्या मनाला निर्णय घेण्याची सवय करून घेतल्यास जीवनात उत्तम यश मिळेल. विशेषतः करिअर निवडण्याच्या बाबतीत ही गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कल्पनाशक्तीच्या आधारावर कलासक्त कार्यात उत्तम यश मिळू शकेल. दुसर्‍यावर लवकर विश्वास ठेवण्याच्या वृत्तीमुळे बर्‍याच वेळा आर्थिक बाबतीत फसवणूक होण्याची शक्यता आहे. विवाहाद्वारे पत्नीच्या नातेवाईकांकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

30 नोव्हेेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध, गुरू, मंगळ ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास धनु आहे. गुरू व मंगळ यांची युती हा एक अतिशय सामर्थ्यवान योग आहे. कोणतेही करिअर निवडले तरी त्यात तुम्हाला महत्त्व प्राप्त होऊन यश मिळेल. सुरूवातीच्या काळात तुम्हाला अनेक अडचणी व संकटांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास दांडगा राहील. काहींच्या डोक्यावरचे आई वडिलांचे छत्र नियतीने हिरावल्यामुळे त्यांच्या खांद्यावर संसाराचा भार लवकर पडेल. वाईटातून चांगले असे की, त्यामुळे लहानपणीच जबाबदारी घेण्याची सवय लागेल. इतरांची काळजी घ्यावी लागणे हा जणू काय जीवनाचा उद्देशच आहे. कोणत्याही प्रकारचे काम केले तरी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. पैसा मिळत असल्यामुळे त्यासाठी कराव्या लागणार्‍या अतिश्रमाचा परिणाम होऊन स्वास्थहानी होऊ नये याची काळजी घ्यावी.

1 डिसेेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर गुरू, रवि, हर्षल ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास धनु आहे. स्वभाव आनंदी असून दांडगा आहे. चेहर्‍यावर सदैव हास्य झळकत राहील. आशावादी आहात. स्पष्टवक्ते व उदार आहात. नवनवीन कल्पना कृतीत आणण्याचे धाडस तुमच्यात आहे. एके ठिकाणी अपयश आले तर लगेच उद्योगाचा मार्ग बदलून दुसरा उद्योग सुरू कराल. काही झाले तरी शेवटी यशाची माळ तुमच्या गळ्यात पडेल यात शंका नाही. तुमच्याजवळ अध्यात्मिक शक्ती असून अंर्तज्ञानाने समोरची व्यक्ती कशी आहे. ते लगेच समजते. त्यामुळे तुम्हाला कोणीही फसवू शकणार नाही. तुमची कर्तृत्वशक्ती दांडगी आहे. दुसर्‍याच्या हाताखाली काम करणे जमणार नाही.

2 डिसेेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर नेपच्यून, चंद्र,गुरू ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास धनु आहे. तुमचा स्वभाव सौम्य आहे. आशावादाबद्दल साशंक असता तुमचा आत्मविश्वास काहीसा कमी आहे. सांसारीक प्रगतीबद्दल विशेष रस नसून तुम्ही अध्यात्मात विशेष रमता. तुमची बौद्धिक उंची समाजापेक्षा जास्त आहे. अध्यात्म, धर्म, गूढशास्त्रे, आणि तत्सम शास्त्रामध्ये जास्त गोडी वाटेल. तुमची स्वप्ने बर्‍याच प्रमाणात खरी होतात. भावी जीवनातील घटनांची अगोदरच चाहूल लागते. बरीच भाकीते खरी ठरतात. असे असूनही स्वार्थासाठी या गूढशक्तीचा उपयोग करणे आवडत नाही. धार्मिक गुरू अथवा शिक्षक म्हणून उत्तम यश मिळेल. पैसे मिळविण्यात तुम्हाला रस नसला तरी बुद्धीमत्ता व अनाकलनीय सामर्थ्य पाहून कोणत्याही क्षेत्रात उच्चपद प्राप्त होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या