Friday, May 3, 2024
Homeजळगावडॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय रूग्णालयात आरटीपीसीआर चाचणी

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय रूग्णालयात आरटीपीसीआर चाचणी

जळगाव – Jalgaon

येथील गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय तसेच रूग्णालय हे वैद्यकिय यंत्रणा, सुविधांसह पॅरामेडिकल कर्मचारी यंत्रणा असल्याने अत्यावश्यक सेवेंतर्गत डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल सेवा म्हणून जिल्हा प्रशासनाकडून अधिग्रहित करण्यात आले आहे.

- Advertisement -

कोरोना प्रादूर्भाव प्रतिबंधक उपायायोजनांतर्गत आपत्कालीन व्यवस्था म्हणून डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय रूग्णालयात आरटीपीसीआर चाचणी करण्यास निर्देशित करण्यात आले आहे. त्यानुसार अत्यावश्यक सेवेंतर्गत अधिग्रहित करण्यात आलेल्या रूग्णालयामार्फत आरटीपीसीआर तपासणीसाठी कोणत्याही रूग्णांकडून शुल्क आकारणी करू नये असे जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात निर्देशीत केले आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या