Saturday, May 4, 2024
Homeनगर14 जणांच्या टोळक्याकडून युवकाला मारहाण

14 जणांच्या टोळक्याकडून युवकाला मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शिवीगाळ केल्याचा जाब विचारला म्हणून 14 जणांच्या टोळक्याने एकाला चाकू, तलवार, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले.

- Advertisement -

सावेडीच्या यशोदानगरमधील पानटपरीसमोर ही घटना घडली.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात 14 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य लोखंडे, भुजंग लोखंडे, हरिश नायर, काशिनाथ बबन शिंदे, दुर्गा शिंदे, सनि शिंदे, शुभम धनगर, विशाल फुंदे, मुसा शिंदे, सचिन शिंदे (सर्व रा. वैदुवाडी, नगर) व अनोळखी चार इसम अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

जखमी मयुर बाळासाहेब सोमवंशी (वय- 21 रा. पद्मानगर, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यशोदानगरमधील पानटपरी जवळ आले. यावेळी आरोपी फिर्यादीला विनाकारण शिवीगाळ करून लागले. यावेळी फिर्यादी त्यांना म्हणाले, तुमचे माझे वाद नाही, तुम्ही मला विनाकारण शिवीगाळ करू नका,असे म्हणताच आरोपींनी फिर्यादीला मारहाण करून जखमी केले. फिर्यादी यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून पुढील तपास पोलीस नाईक कांबळे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या