Saturday, May 4, 2024
Homeनाशिकदारूसाठी पैसे न दिल्याने दुकान पेटवले

दारूसाठी पैसे न दिल्याने दुकान पेटवले

नाशिक | प्रतिनिधी

दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणातून एकाने स्पेअरपार्टसचे दुकान पेटवून दिल्याची घटना शनिवारी (दि.१२) रात्री भगूर परिसरात घडली…

- Advertisement -

अजय हासे (रा. भगूर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी निलेश घुरीया (रा. देवळाली गाव) यांनी तक्रार दाखल केली आहे.

त्यानुसार शनिवारी सकाळी संशयित अजय हासे याने घुरीया यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. पैसे देण्यास नकार देताच त्याने शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली होती.

तर रात्री १० वाजेच्या दरम्यान ज्वलनशिल पदार्थ टाकून दुकान पेटवून दिले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या