Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्हा रुग्णालयाला प्लाझ्मा थेरपीसाठी मिळेना रुग्ण

जिल्हा रुग्णालयाला प्लाझ्मा थेरपीसाठी मिळेना रुग्ण

नाशिक । कुंदन राजपूत Nashik

करोना लस येण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाकडून मोठया प्रमाणात प्लाझ्मा थेरपीचा गवगवा करण्यात आला होता. मात्र, जिल्हा रुग्णालयात आतापर्यंत एकाही रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आली नाही. अडीचशेवर करोनामुक्त झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा देण्यासाठी जिल्हा रुग्णालयाकडे नोंदणी केली आहे.

- Advertisement -

पण प्लाझ्मा थेरपीसाठी रुग्णच येत नसल्याने तेथील वातानुकुलित कक्षात चौदा लाखांचे प्लाझ्मा थेरपी मशीन विना उपयोग पडून आहे. याउलट खासगी रुग्णालयात एक हजारहून रुग्णांनी प्लाझ्मा थेरपी केली आहे. करोना लस येण्यापुर्वी देशभरात प्लाझ्मा थेरपी उपचार पध्दतीची चर्चा होती.

आयसीएमआरने देशातील प्रत्येक जिल्हा रुग्णालयाला प्लाझ्मा संकलन मशीन उपलब्ध करुन दिले. नाशिक जिल्हा रुग्णालयालाही 14 लाखांचे नविन मशीन देण्यात आले. प्लाझ्मा थेरपीत करोनावर मात केलेल्या रुग्णाच्या रक्तातील प्लाझा संकलित करुन त्या एंटी बॉडिज करोना बाधित रुग्णाला दिल्या जातात. जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयासह नाशिल ब्लड बॅक, जनकल्याण ब्लड बॅक व अर्पण ब्लड बॅक यांना प्लाझ्मा संकलनची परवानगी देण्यात आली आहे.

मात्र जिल्हा रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीसाठी एकही करोना बाधित रुग्ण आला नाही. या उलट खासगी खासगी ब्लड बॅकमध्ये आतापर्यंत 500 हून अधिक करोनावर मात केलेल्या रुग्णांनी प्लाझ्मा डोनेट केला आहे. तब्बल एक हजाराहून अधिक करोना रुग्णांना हा प्लाझ्मा देण्यात आला. प्लाझ्मा थेरपीसाठी रुग्णच येत नसल्याने जिल्हा रुग्णालयातील नवेकोरे मशीन तसेच वातानुकुलित कक्षात पडून आहे. प्लाझ्मा थेरपीसाठी रुग्णांचा ओढा हा खासगी रुग्णालयाकडे असल्याचे पहायला मिळते.

आता हे मशीन पांढऱ्या पेशी संकलित करणार

जिल्हा रुग्णालयाला देण्यात आलेल्या मशीनद्वारे प्लाझ्मा संकलन करणे व तो दुसर्या रुग्णाला देणे ही दोन्ही कामे करता येतात. पण प्लाझ्मा थेरपीसाठी रुग्णच येत नसल्याने हे मशीन रक्तातील पांढर्या पेशी संकलनासाठी वापरात आणले जाणार आहे. कर्करोग,मलेरिया व इतर आजार झालेल्या रुग्णांना पांढर्या पेशी देणे गरजेच्या असता.

जिल्हा रुग्णालयाला आयसीएमआरकडून प्लाझा संकलन मशीन मिळाले आहे. प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी अडीचशे जणांनी नोंदणी केली आहे. मात्र रुग्णच आले नसल्याने या ठिकाणी प्लाझ्मा थेरपी करण्यात आली नाही.

-डॉ.लोहाडे, प्लाझा थेरपी इन्चार्ज

एक वर्ष टिकतो प्लाझ्मा

करोनावर मात केलेला रुग्ण 28 दिवसानंतर प्लाझ्मा डोनेट करु शकतो. एका रुग्णाकडून चार एमएल प्लाझ्मा संकलन केला जातो. त्याद्वारे दोन करोना बाधितांवर प्लाझा थेरपी शक्य होते. एका करोना बाधितावर उपचारासाठी दोन एमएल प्लाझ्माची गरज असते. संकलित केलेला प्लाझ्मा एक वर्ष शीतगृहात उणे 40 ते 80 डिग्री सेल्सिअस तापमानात टिकतो.

प्लाझ्मा संकलन

अर्पण ब्लड बँक – 290

नाशिक ब्लड बॅक – 135

जनकल्याण बल्ड बॅक – 80

- Advertisment -

ताज्या बातम्या