Friday, May 3, 2024
Homeनाशिकबस स्थानकात औरंगाबाद नावाच्या पाट्या काढून संभाजीनगर स्टीकर लावले; नाशिकमध्ये मनसे आक्रमक

बस स्थानकात औरंगाबाद नावाच्या पाट्या काढून संभाजीनगर स्टीकर लावले; नाशिकमध्ये मनसे आक्रमक

नाशिक l Nashik

येत्या २६ जानेवारी पर्यंत औरंगाबाद शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ करा असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला देण्यात आला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापकीय अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व ज्येष्ठ नेते डॉ. प्रदीप पवार, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष अँँड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी व दिलीप दत्तु दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार, ज्येष्ठ नगरसेवक सलिम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राज्य परिवहन मंडळाच्या बसेसवर ‘छत्रपती संभाजीनगर’ असे फलक चिटकवून आंदोलन करण्यात आले.

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी १९८८ साली औरंगाबाद येथील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर विजयी सभेत बोलतांना शहराचे नाव औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर ठेवत असल्याची घोषणा केली होती.

जुन १९९५ मध्ये औरंगाबाद महापालिकेत छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्याच्या मंजूर झालेल्या ठरावाला राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरीही मिळाली. कॉंग्रेसच्या तत्कालीन नगरसेवकाने ह्या विरुद्ध आधी हायकोर्टात व नंतर सुप्रीम कोर्टात याचिका टाकली.

एकेकाळी छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्याच्या मुद्यावर राजकारण करणाऱ्या शिवसेनेने आता कॉंग्रेस बरोबर घरोबा मांडला असून या नामकरणाबाबत गुळमीळीत भुमिका घेतली आहे.

महाराष्ट्राच्या जनतेसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत असून छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने स्वराज्य लढ्याला मिळालेल्या उभारी मुळे हिंदू पद्पातशाहीचे थोरल्या महाराजांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले.

याच औरंगाबादच्या भूमीत क्रूरकर्मा औरंगझेबने छत्रपती संभाजी महाराजांचा अनन्वित छळ केला. छ. संभाजी महाराजांच्या रक्ताने पावन झालेल्या भूमीस त्यांचे नाव देण्यात यावे अशी राज्यातील जनतेची भोळी भावना असून तशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे.

या प्रसंगी शहराध्यक्ष अंकुश पवार, मनोज घोडके, भाऊसाहेब निमसे, सत्यम खंडाळे, संतोष कोरडे, संजय देवरे, अमित गांगुर्डे, निखील सरपोतदार, किशोर वडजे, नितीन माळी, अर्जुन वेताळ, चंद्रभान ताजनपुरे, गोकुळ नागरे, साहेबराव खर्जुल, सुनील पाटोळे, शाम गोहाड, संदेश जगताप, सिद्धेश सानप, अक्षय कोंबडे, दत्तात्रय इंगळे आदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या